आपला जिल्हासामाजिक

यशाला शाॅटकट नसतो,त्यासाठी भरपुर मेहनत घ्यावी लागते – उपविभागीय अधिकारी डाॅ सचिन खल्लाळ

मुख्य संपादक रामु चव्हाण

वसमत/ रामु चव्हाण

शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा जामगव्हाण व लायन्स क्लब बसमत प्राईड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 25 जुलै 2026 रोजी वृक्षारोपण कार्यक्रम व करियर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री एन जी गायकवाड सर तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून सन्माननीय उपजिल्हाधिकारी श्री डॉक्टर सचिन खल्लाळ सर, लायन्स क्लबचे अध्यक्ष श्री संजीव कुमार बेंडके, उपाध्यक्ष गौस भाई, सचिव श्री कल्याण कुरुंदकर, कोषाध्यक्ष श्री संदीप चव्हाण सर, श्री राजू सिद्दिकी सर सेवानिवृत्त पीएसआय,श्रीमती वंदनाताई माहोरे सरपंच जामगव्हाण , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री गणपतराव बरडे, ज्येष्ठ नागरिक चांदोजी मामा मेंडके उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व धरतीआबा क्रांतीसुर्य बिरसा मुंडा, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. मान्यवरांच्या स्वागत समारंभा नंतर प्रास्ताविक श्री अनिल काळबांडे सर यांनी केले. करियर मार्गदर्शन या विषयावर विद्यार्थ्यांशी हितगुज करताना सन्माननीय उपजिल्हाधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ सर यांनी यशाला कुठलाच शॉर्टकट नसतो तर त्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावीच लागेल तसेच आज प्रत्येक व्यक्तीला स्पर्धा परीक्षा देण्याची व अधिकारी होण्याची संधी आहे त्यासाठी एकाग्रचित्ताने सातत्यपूर्वक अभ्यास करावा . बदलत्या काळाप्रमाणे स्वतःमध्ये बदल करून नवीन येणारे तंत्रज्ञान आत्मसात करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच भविष्यकाळात नोकरीच्या संधी आहेत असे मत प्रतिपादन केले. विविध उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा यशस्वीतेचा मूलमंत्र सांगितला. तसेच श्री संदीप चव्हाण सर यांनी देखील शाळा पातळीवरील विविध स्पर्धा परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांनी कशी करावी याबद्दल मार्गदर्शन केले. अध्यक्ष भाषणात सन्माननीय श्री गायकवाड सर यांनी भविष्यात स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी शालेय पातळीवर होणाऱ्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन तयारी करावी असे मत मांडले.


सर्व मान्यवरांच्या हस्ते शालेय परिसरात कडुनिंबाच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बेले सर यांनी केले. कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. आभार प्रदर्शन श्री सूर्यवंशी सर यांनी केले
यावेळी लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!