आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणक्राईम स्टोरीताज्या घडामोडीसामाजिक

रुग्णवाहिका २४ तास सुरू, पण ‘मे’ आणि ‘जून’मध्ये मिळाले केवळ ८ च रुग्ण? शासकीय स्त्री रुग्णालयाच्या खुलाशानंतर उलट सुलट चर्चा!

विशेष प्रतिनिधी

रुग्णवाहिका २४ तास सुरू, पण ‘मे’ आणि ‘जून’मध्ये मिळाले केवळ ८ च रुग्ण? शासकीय स्त्री रुग्णालयाच्या खुलाशानंतर उलट सुलट चर्चा!

वसमत:
हिंगोली समाचारमधील वृत्त खोडून काढण्याच्या घाईत वसमत येथील शासकीय स्त्री रुग्णालय प्रशासनाचा एक मोठा ‘Self-Goal’ (स्वतःचेच हसे करून घेणे) झाला आहे. रुग्णवाहिका २४ तास अविरत सुरू असल्याचा दावा करत असताना, वैद्यकीय अधीक्षकांनी जाहीर केलेल्या शासकीय आकडेवारीनेच सर्वांचे डोळे पांढरे केले आहेत.
प्रशासनाने स्वतः जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार,
मे महिन्यात केवळ ३ आणि जून महिन्यात केवळ ५ अशा संपूर्ण दोन महिन्यांत मिळून फक्त ‘८’ रुग्णांनाच रुग्णवाहिकेने संदर्भसेवा दिली आहे.
मुख्य मुद्दे आणि आकडेवारी:
तथाकथित २४ तास सेवा: दोन्ही रुग्णवाहिका (MH-38-X-2247 आणि MH-38-X-2724) दिवस-रात्र सुरू असल्याचा प्रशासनाचा दावा.
दोन महिन्यांत केवळ ८ रुग्ण: मे आणि जून या ऐन उन्हाळा-पावसाळ्याच्या महत्त्वाच्या दोन महिन्यांत कोट्यवधींच्या या रुग्णवाहिकांमधून केवळ ८ रुग्णांना सेवा मिळाली.
प्रश्नचिन्ह: २४ तास रुग्णवाहिका सुरू असतील आणि संपूर्ण तालुक्यातून दोन महिन्यांत केवळ ८ रुग्णांनाच सेवा मिळाली असेल, तर या रुग्णवाहिका नक्की चालतात कोणासाठी? की केवळ कागदावरच डिझेल खर्च दाखवला जात आहे?
औषधांचा तुटवडा नसल्याचा दावा वैद्यकीय अधीक्षकांनी केला असला, तरी रुग्णवाहिकेच्या या ‘महान’ आकडेवारीमुळे रुग्णालयाचा कारभार किती ढेपाळला आहे आणि गरजू रुग्णांना खरंच वेळेवर सेवा मिळते का, यावर आता वसमतकरांमधून संतप्त सवाल उपस्थित केले जात आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!