आपला जिल्हाक्राईम स्टोरी

कळमनुरी मर्डर केस: ५ तासांच्या थरारक नाकाबंदीनंतर एलसीबीने ठोकल्या मुख्य आरोपींना बेड्या!

वसमत.सि.टी.न्यूज

 कळमनुरी मर्डर केस: ५ तासांच्या थरारक नाकाबंदीनंतर एलसीबीने ठोकल्या मुख्य आरोपींना बेड्या!

वसमत CT NEWS

हिंगोली / वाशिम:

कळमनुरी येथील साईनगर परिसरात घडलेल्या थरारक हत्याकांडातून पसार झालेल्या दोन मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) अखेर यश आले आहे. वाशिम जिल्ह्यातील महामार्गावर तब्बल ५ तास हायव्होल्टेज नाकाबंदी करून, पोलिसांनी दोन सराईत आरोपींना सिनेस्टाईल पाठलाग करत जेरबंद केले.

🚨 काय आहे घटना?

दिनांक २२ मे २०२६ रोजी शुक्रवारच्या संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास कळमनुरी येथील साईनगर भागातील खुल्या मैदानात एका युवकाची डोक्यात दगड घालून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळजनक उडाली होती.

घटनेचे गांभीर्य ओळखून हिंगोलीचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट दिली होती. पोलिसांनी तत्परता दाखवत यापूर्वीच ४ आरोपींना गजाआड केले होते, मात्र हत्येतील मुख्य सूत्रधार असलेले दोन आरोपी गुन्हा घडल्यापासून पोलिसांना गुंगारा देत फरार होते.

🔍 ५ तासांची थरारक नाकाबंदी आणि ‘द गेम ओव्हर’!

फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मैदानात उतरवले होते. गुन्हे शाखेचे पथक आधुनिक तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींच्या मागावर होते.

दरम्यान, ‘ते’ दोन्ही आरोपी वाशिम-अकोला महामार्गावरून प्रवास करत असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली. वेळ न गमावता गुन्हे शाखेच्या पथकाने वाशिम जिल्ह्यात महामार्गावर सापळा रचला. तब्बल ५ तास कसून नाकाबंदी केल्यानंतर, पोलिसांच्या जाळ्यात दोघेही अडकले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:

१) आकाश विठ्ठल सातव (वय २८ वर्षे, रा. पाटील गल्ली, कळमनुरी)

२) भरत शंकरलाल यादव (वय २५ वर्षे, रा. साईनगर, कळमनुरी)

दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी कळमनुरी पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

 👮 ‘या’ शिलेदारांनी फत्ते केली मोहीम!

सदरची धडक कारवाई हिंगोलीचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन आणि स्थागुशाचे पोलीस निरीक्षक श्री. मोहन भोसले यांच्या थेट मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत सहभागी पथक: स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि शिवसांब घेवारे, पोउपनि माधव जीवारे, पोलीस अंमलदार गजानन पोकळे, सतीश जाधव, शिवाजी जाल्मिरे, हरिभाऊ गुंजकर, दत्ता नागरे आणि मारोती काकडे.

पोलिसांच्या या झंझावाती कामगिरीमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून, कळमनुरी परिसरातून पोलिसांचे मोठे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!