आपला जिल्हाताज्या घडामोडी

वसमत येथील मतदान केंद्रांना हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांची भेट; ‘एसआयआर’ अंतर्गत मतदार यादी पुनरीक्षण कामाचा घेतला आढावा

संपादक: हरनामसिंग चव्हाण

वसमत येथील मतदान केंद्रांना हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांची भेट; ‘एसआयआर’ अंतर्गत मतदार यादी पुनरीक्षण कामाचा घेतला आढावा

वसमत CT NEWS
संपादक: हरनामसिंग चव्हाण

वसमत:
मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर – SIR) मोहिमेअंतर्गत वसमत शहरातील मतदान केंद्रांवर सुरू असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी नुकतीच भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी केंद्रावर नियुक्त असलेल्या बी.एल.ओ. (BLO) यांच्या ‘एसआयआर’ अंतर्गत चाललेल्या कामाचा सविस्तर आढावा घेतला, तसेच नागरिकांना या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी वसमत शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्राह्मण गल्ली येथील बोदानंद मठ येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘एसआयआर कॅम्प’ला विशेष भेट दिली. याप्रसंगी त्यांनी उपस्थित मतदारांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. तसेच, कोणताही पात्र मतदार यादीतून सुटणार नाही याची दक्षता घेत बी.एल.ओ. यांनी काम करावे, अशा आवश्यक व महत्त्वाच्या सूचना त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना दिल्या.
नागरिकांना फॉर्म भरण्याचे आवाहन
“शहरातील नागरिकांनी आपले ‘एसआयआर’ फॉर्म अचूक भरून ते संबंधित मतदान केंद्राच्या बी.एल.ओ. यांच्याकडे त्वरित जमा करावेत, जेणेकरून मतदार यादीचे काम निर्दोष आणि अद्ययावत होण्यास मदत होईल,” असे आवाहन माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती
या महत्त्वपूर्ण दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांसोबत वसमतचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) माननीय विकास माने, नगर परिषदेचे मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर, तसेच तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी आणि महसूल सहाय्यक निवडणूक विभागाचे श्री. अनिल पाटील व शेख शफी उपस्थित होते.
याशिवाय नगरपरिषदेचे कर्मचारी श्री. अरविंद शिकारी, ज्ञानेश्वर जाधव, सुभाष निरावार, बालाजी सोनवणे, स्वच्छता निरीक्षक भुजंग भिसे, प्रवीण दहिवाळ यांच्यासह इतर कार्यालयीन कर्मचारी व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!