आपला जिल्हामहाराष्ट्र

वसमतसह ग्रामीण भागात जोरदार रिमझिम पाऊस; बळीराजा सुखावला, बोअरवेलच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने नागरिक आनंदित!
वसमत CT NEWS
वसमत: रामु चव्हाण
गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने काल पासून वसमत शहरासह संपूर्ण ग्रामीण भागात जोरदार हजेरी लावली. आलेल्या या पावसामुळे सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली होती. या दमदार पावसामुळे सुकत चाललेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली असून, शेतकरी वर्गामध्ये कमालीचे समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
पिकांना जीवदान; बळीराजा आनंदात
चालू हंगामात पावसाने ओढ दिल्याने तालुक्यातील शेतकरी चिंतेत ग्रासला होता. दुबार पेरणीचे संकट ओढावते की काय, अशी भीती निर्माण झाली होती. मात्र, आज झालेल्या या जोरदार पावसामुळे शेतातील पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कापूस, सोयाबीन आणि हळद, ऊस या पिकांसाठी हा पाऊस अत्यंत फायदेशीर ठरणार असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमलले आहे.
बोअरवेलच्या पाणीपातळीत वाढ
केवळ शेतीच नाही तर सर्वसामान्य नागरिकांसाठीही हा पाऊस दिलासादायक ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून भूगर्भातील पाणीपातळी खालावल्याने अनेक भागांत पाणीटंचाई जाणवू लागली होती. मात्र, या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले असून, विहिरी आणि बोअरवेलच्या (बोर) पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे उन्हाची तीव्रता कमी होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला आहे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही अंशी सुटल्याने नागरिक आनंद व्यक्त करत आहेत.
शेतकऱ्यांची प्रतिक्रिया:
“या पावसाची अत्यंत गरज होती. पिके सुकू लागली होती, पण आजच्या पावसाने पिकांना अमृत मिळाले आहे. आता उत्पादनात चांगली सुधारणा होईल अशी आशा आहे.”
शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!