आपला जिल्हासामाजिक

वसमत येथील थोरला मठ संस्थानचे लि.आ. सद्गुरू १०८ सांब शिवाचार्य महाराज यांचा प्रथम पुण्यस्मरण व गणाराधना सोहळा उत्साहात सुरू

संपादक हरनामसिंग चव्हाण

वसमत येथील थोरला मठ संस्थानचे लि.आ. सद्गुरू १०८ सांब शिवाचार्य महाराज यांचा प्रथम पुण्यस्मरण व गणाराधना सोहळा उत्साहात सुरू

वसमत CT NEWS

वसमत (जिल्हा हिंगोली):
येथील प्रतिष्ठित संस्थान थोरला मठ, वसमतचे मठाधिपती लि.आ. सद्गुरु १०८ सांब शिवाचार्य महाराज यांचा प्रथम पुण्यस्मरण व गणाराधना सोहळा आज शनिवार, दिनांक ४ जुलै २०२६ पासून अत्यंत भक्तीमय वातावरणात सुरू झाला आहे. हा सोहळा सोमवार, दिनांक ६ जुलै २०२६ पर्यंत विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. या सोहळ्यादरम्यान महाराजांच्या ‘मार्ग हा मुक्तीचा’ या ग्रंथाचा अनावरण सोहळा देखील संपन्न होणार आहे.
विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल (कार्यक्रमाची रूपरेषा):
थोरला मठाचे मठाधिपती श्री ष.ब्र. १०८ युवा संत वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली या त्रैधशताब्दी सोहळ्याचे नेटके नियोजन करण्यात आले आहे. ३ दिवसीय कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे आहे:
शनिवार, दि. ०४/०७/२०२६:
सकाळी ८:०० वाजता समाधीस रुद्राभिषेक करून सोहळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर सकाळी १०:०० वाजता ‘परमरहस्य’ ग्रंथ पारायणाला प्रारंभ करण्यात आला. दुपारी ४:०० वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
रविवार, दि. ०५/०७/२०२६:
सकाळी ८:०० वाजता समाधीस रुद्राभिषेक, सकाळी ९:०० वाजता पारायण सांगता होईल. त्यानंतर सकाळी १०:०० वाजता श्री ष.ब्र. १०८ सद्गुरु विश्वचैतन्य शिवाचार्य महाराज (आष्टी लक्ष्मणची) यांचे प्रसादावरील विशेष कीर्तन संपन्न होईल. दुपारी २:०० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार, दि. ०६/०७/२०२६ (मुख्य दिवस – धर्मसभा व महाप्रसाद):
सोमवारी सकाळी ८:०० वाजता लिंगस्थापना, सकाळी ९:०० वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात येईल. त्यानंतर सकाळी ११:०० वाजता
बसवेश्वर मंगल कार्यालय, वसमत येथे मुख्य ‘धर्मसभा’ संपन्न होईल. दुपारी १:०० वाजता भव्य महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होईल.
प्रमुख संतांची व मान्यवरांची उपस्थिती:
या सोहळ्याला ज्ञान सिंहासनाधीश्वर श्रीमद जगदगुरु श्री श्री श्री १००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी वाराणसी (काशी पीठ) यांची पावन उपस्थिती लाभणार आहे.
त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील व परिसरातील अनेक थोर संत, गुरुवर्य आणि मठाधिपती उपस्थित राहणार आहेत, ज्यात प्रामुख्याने:
श्री ष.ब्र. १०८ गुरुवर्य वेदांताचार्य सिद्धलिंग शिवाचार्य महाराज (साखरखेर्डा)
श्री ष.ब्र. १०८ गुरुवर्य नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज (पुर्णा)
श्री ष.ब्र. १०८ गुरुवर्य रुद्रमुनी शिवाचार्य महाराज (मुदखेड)
श्री ष.ब्र. १०८ गुरुवर्य करबसव शिवाचार्य महाराज (वसमत)
श्री ष.ब्र. १०८ गुरुवर्य सिद्धदयाल शिवाचार्य महाराज (बेटमोगरा)
गुरुवर्य म.नी.प्र. गंगाधर महास्वामी विरक्त मठ (जेवळी)
यांसह अनेक तपस्वी महापुरुष, शिवकीर्तनकार, कथाकार, प्रवचनकार आणि भजन मंडळी उपस्थित राहणार आहेत.
भव्य उपस्थितीचे आवाहन:
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सदभक्त मंडळ, थोरला मठ, वसमत आणि वीरशैव लिंगायत समाज, वसमत यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. वसमत व हिंगोली जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील समस्त वीरशैव लिंगायत बांधवांनी आणि भाविकांनी या तिन्ही दिवशी मठात व सोमवारी बसवेश्वर मंगल कार्यालय येथील धर्मसभेला आणि महाप्रसादाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विनीत सदभक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!