आपला जिल्हाराजकीय
वसमत व औंढा तालुक्यातील बंधा-यासाठी आ.राजूभैय्या नवघरे यांनी आनला भरीव निधी
रामु चव्हाण

पाण्याच्या बाबतीत वसमत मतदार संघ होणार स्वयंपुर्ण
महामंडळाची योजना शासनाकडे वर्ग करुन जलसंधारण विकासाच्या कामांना मंजुरी – आ.राजूूूभैय्या नवघरे
वसमत / रामु चव्हाण
हिंगोली जिल्हा पाण्याच्या बाबतीत दुष्काळ ग्रस्त भाग आहे. त्यामुळे पाण्याची किंमत सर्वांनाच कळुन चुकलेली आहे. त्यासाठी वेळोवळी मा. राज्यपाल साहेबांकडे पाठपुरावा करुन हिंगोली जिल्हा सिंचन अनुशेष मंजुर केल्यानंतर जिल्हाभरामध्ये सिंचन अन्नुशेषाची कामास सुरुवात झाली असुन त्याअनुषंगाने वसमत मतदार संघातील जिथे नदी तिथे बंधारा या संकल्पनेतून वसमत व आैंढा तालुक्यामध्ये मृद व जलसंधारण अंर्तगत कोल्हापुर पध्दती बंधारे, सिमेंट बंधारे, पाझर तलाव आदि. कामे पुर्ण करण्यासाठी आ. राजुभौया न्नवघरे यांनी मृद व जलसंधारण मंत्री मा.ना. शंकरराव गडाख साहेब यांची भेट घेवुन्न वसमत व आैंढा मतदार संघातील कामांसाठी पाठपुरावा केला असता वसमत व आैंढा तालुक्यातील मौ. आसेगाव, महागांव, कोन्नाथ, वाघी, सिंगी, पिंपळाचौरे, मरलापुर, कोर्टा, बळेगांव, गिरगांव, खंदारबन्न, येळी, दौडगांव, अन्नखळी, हिवरखेडा या ठिकाणी बंधारे बांधकामास मंजुरी दिली असुन निधी उपलब्ध करुन्न दिला आहे.
तसेच वसमत मतदार संघातील आणखी 80 ठिकाणी मृद व जलसंधारण अंर्तगत बंधारे बांधकाम करण्यासाठी कामे प्रस्तावित केली आहे.
त्यासाठी आमदार राजुभैैैैैय्या नवघरे यांनी मा.ना. शंकररावजी गडाख साहेब यांचे आभार मानले. या बंधा-यांच्या कामांमुळे हिंगोली जिल्हयातील वसमत आैंढा मतदार संघातील अनुुुशेष भरुन्न काढण्यास मदत होणार असुुुन सोबतच शेतकरी व परिसरातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न्न कायमचा मिटणार आहे.