राजे प्रतिष्ठान हिंगोली च्या वतीने राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन जिल्हा परिषद मैदानावर करण्यात आले आहे.
राजे प्रतिष्ठान हिंगोली च्या वतीने दि.11 जानेवारी रोजी दुपारी 2-00 वा वसमत येथील जिल्हा परिषद मैदानावर राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी प.पू.कालिचरण महाराज यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .तसेच प.पु.श्री ष.ब्र.108 वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांची प्रमुख उपस्थितीत लाभणार आहे.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून वसमत चे आमदार राजु भैय्या नवघरे तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हेमंत पाटील,नितीनदादा शिंदे ( राजे प्रतिष्ठान कार्याध्यक्ष) हे उपस्थितीत रहाणार आहेत.
तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन राजे प्रतिष्ठान हिंगोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.