वसमत शहरातून अनेक रुग्णांना डायलेसीससाठी नांदेड, परभणी येथे जावे लागते. सदर अडचण लक्षात घेऊन वसमत विधानसभेचे आमदार राजुभैय्या नवघरे यानी वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात डायलेसीस केंद्र सुरु करण्यासाठी पाठपुरावा केला व केंद्रास मंजुरी मिळवून आनली व आवश्यक त्या मशनरी उपजिल्हा रुग्णालय, वसमत येथे आल्या आहेत. परंतु अद्याप केंद्र कार्यान्वीत झालेले नाही. त्यामुळे आजही रुग्णांना डायलेसीससाठी नांदेड, परभणी येथे खाजगी रुग्णालयात जावे लागत असून त्यात रुग्णांची हेळसांड व पैशाचा भुर्दंड रुग्णांना सहन करावा लागत आहे.रूग्णाना डायलेसीस साठी बाहेर जिल्ह्यात ये जा करताना प्रकृती सुद्धा खालावत आहे .त्याच बरोबर रुग्णाचे नातेवाईकांना दवाखाना फीसचा मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
तरी प्रकरणी दाखल घेऊन तात्काळ उपजिल्हा रुग्णालय वसमत येथील डायलेसीस केंद्र तात्काळ सुरु करुन रुग्णांना दिलासा द्यावा असे मागणीचे निवेदन वसमत विधानसभेचे आमदार राजुभैय्या नवघरे यांच्याकडे केली आहे.या निवेदनावर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शेख अलीमोद्दीन,शेख इरफान शेख बाले सहसचिव यांच्या स्वाक्षरी आहेत.