आपला जिल्हा

वसमत येथील स्व. दत्ता चौगुले सभागृह च्या उदघाटन सोहळ्यावर शिवसेना( उ बा ठा) चा बहिष्कार

वसमत येथील स्व. दत्ता चौगुले सभागृह च्या उदघाटन सोहळ्यावर शिवसेना( उ बा ठा) चा बहिष्कार

वसमत:

   येथील सुरमणी दत्ता चौगुले सभागृह हे संस्कृतीक सभागृह हे वसमत येथील नागरिकांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी उपयोगी व्हावे या हेतूने वसमत येथील सुरमणी दत्ता चौगुले सभागृह नगरपरिषदे कडून सांस्कृतिक सभागृह बनविण्यात आले. चौगुले सभागृह तयार होऊन पधरा वर्षाचा कालावधी लोटला तरी सभागृह चे उद्घाटन समारंभ झाले नव्हते अनेक वर्षापासून धुळखात पडलेला सभागृह हे वसमत शहरातील नागरिकांना खुले करून देण्याची मागणी करीत अनेक वेळा शहरातील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली निवेदने दिले परंतु सभागृह चालू करण्या संबंधी अनेक वर्ष लोटले तरी नगरपरिषद प्रशासनाकडून सांस्कृतिक सभागृह चालू करण्यात आले नव्हते. परंतु अनेक वर्षानंतर विद्यमान आमदार राजू नवघरे यांच्या माध्यमातून सुरमणि दत्ता चौगुले सभागृह चा उद्घाटनाचा अनेक वर्षानंतर योग आला सूरमणी दत्ता चौघुले सभागृहा चा उद्घाटन सोहळ्यास हिंगोली जिल्ह्याचे खासदार श्री नागेश पाटील आष्टीकर यांना आमंत्रित केले नसल्यामुळे वसमत येथील शिवसेना( उ बा ठा) गट वसमत पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करीत सूरमनी दत्ता चौगुले सभागृह च्या उद्घाटन समारंभास बहिष्कार टाकण्याची घोषणा केली. हिंगोली जिल्ह्याचे खासदार मा. नागेश पाटील आष्टीकर यांना वसमत येथील सुरमनी दत्ता चौगुले सार्वजनिक सांस्कृतिक सभागृह च्या उद्घाटन प्रसंगी जिल्ह्याचे खासदार या नात्याने आमंत्रित करणे आवश्यक होते परंतु माननीय खासदार यांना का?आमंत्रित करण्यात आले नाही. हे समजले नाही. म्हणून वसमत शहरातील शिवसेना उबाठा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सदर कार्यक्रमास बहिष्कार टाकण्याचे दैनिक सामना प्रतिनिधीशी बोलताना भावना व्यक्त केल्या यावेळी शिवसेना (उबाठा) सहसंपर्क प्रमुख सुनील भाऊ काळे,मा.नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार, शहर प्रमुख काशिनाथ भोसले,मा नगरसेवक दीपक हळवे,तालुका प्रमुख डॉ पार्डीकर ,उपजिल्हाप्रमुख अनिल कदम, युवासेना युवाधिकारी कन्हैया बाहेती,महिला जिल्हाप्रमुख सौ रेणुकाताई पतंगे, माजी नगरसेवक धनंजय गोरे व अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नाराजगी व्यक्त केली.

शिवसेनेचा नगराध्यक्ष असताना सभागृहाचे कामकाज पुर्ण झाले तसेच यासाठी शिवसेनेने वेळोवेळी पाठपुरावा केला मध्येच कोरोना काळ अल्याने उद्घाटन होऊ शकले नाही.सर्व शिवसेनेच सत्ता असताना झाले आहे  मुख्याधिकारी यानी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना आमंत्रित करणे अपेक्षित होते पण त्यानी तसे न केल्याने या उद्घाटन सोहळ्यास आमचा  बहिष्कार आहे.-सुनिल भाऊ काळे सहसंपर्कप्रमुख

स्व.सुरमणी दत्ता चौगुले सांस्कृतिक सभागृहचे काम काँग्रेस चे माजी नगराध्यक्ष अ.हाफिज अ.रहमान यांच्या कार्यकाळात सुरू झाले पुढे नगर परिषदेत सत्तांतर झाले मी नगराध्यक्ष झाल्या नंतर माझ्या कार्या काळात म्हणजे शिवसेनेचा कार्याकाळात काम पुर्ण झाले मी अध्यक्ष असताना शेवटचा निधी 65 लाख रू वितरित केला.शिवसेनेचा काळात झालेले सभागृह चा उद्घाटनला शिवसेना खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना निमंत्रित न केल्याने या कार्यक्रमावर आमचा बहिष्कार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!