
वसमत / रामु चव्हाण
वसमत नगर परिषदेचे उपाध्यक्ष तथा सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणारे सितारामजी म्यानेवार यांना गोसेवेची दखल घेत.त्याना दै दामाजी एक्स्प्रेस च्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा गो सेवेचा राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.


वसमत तालुक्यातील सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक तसेच समाजकारण करत गोसेवेचा वसा घेतलेले सितारामजी म्यानेवार याना
दैनिक दामाजी एक्सप्रेस या वृत्तपत्राच्यावतीने 30 जुलै रोजी सायंकाळी 4-30 वाजता के. सी. कॉलेज हॉल, मंत्रालयाजवळ, नरिमन पॉईंट, मुंबई येथे राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यात महाराष्ट्रभरातील काही निवडक गुणवंतांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे.
सिताराम म्यानेवार यानी आजवर केलेली गोसेवा व गोरक्षणाचे कार्य विचारात घेता त्याना महाराष्ट्र गौरव या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

त्यांचा निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.