वसमत येथील सामाजिक कार्यकर्ते विनायक चव्हाण यांची आज भाजपा वसमत शहर युवा मोर्चाचा शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
भारतीय जनता पार्टी जिल्हा हिंगोली, तालुका- वसमत शहर अध्यश-युवा मोर्चा पदी विनायक चव्हाण यांची नियुक्ती करण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टीने वरिल पदाच्या माध्यमातुन त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे.
विनायक चव्हाण हे भाजपाचे कार्यक्षम पदाधिकारी आहात, या जबाबदारीचे निर्वाहन समर्थपणे करून भाजपा पक्षाचे ध्येय धोरण जनते पर्यंत पोहोचवण्याचे जबाबदारी विनायक चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
. या पदाच्या माध्यमातुन भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरणे, मा.ना. नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारचे व मा.ना.श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब (मा.श्री रविंद्रजी चव्हान साहेब, भाजपा प्रदेश अध्यक्ष) यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकारचे व लोकहितकारी निर्णय जनसामान्यांपर्यंत पोहचवत पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी आपण परिश्रम घ्याल व भाजपाची प्रतिमा जनमानसात अधिक ओजस्वी कराल याचा विश्वास ठेवून त्यांची भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष पदी निवड केल्याचे पत्र भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी तान्हाजीराव मुटकुळे यानी दिले आहे.
त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.