आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणसामाजिक

लायन्स क्लब वसमत प्राईडचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

रामु चव्हाण

वसमत/ रामु चव्हाण

वसमत येथे  कन्हैया हॉटेल इथे लायन्स क्लब बसमत प्राईड चा दुसरा पदग्रहण सोहळा अतिशय उत्साहात पार पडला.

        या कार्यक्रमाचे अध्यक्ष  लॉयन्स योगेशजी चेपुरवार हे होते. तर या पदग्रहण सोहळ्यासाठी इन्स्टॉलिंग ऑफिसर म्हणून दिलीपजी मोदी, इंडक्शन ऑफिसर म्हणून सन्माननीय योगेश जयस्वाल, चीफ गेस्ट म्हणून सन्माननीय हर्षद भाई शहा, सन्माननीय पंडित जी बरदाळे तसेच ज्यांच्या प्रेरणेने हा क्लब स्थापन झाला ते लॉयन्स श्री मोहनजी देशमुख सर व प्रवीण देशमुख उपस्थित होते. दीप प्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर अध्यक्ष व प्रमुख अतिथी या मान्यवरांची स्वागत करण्यात आले. प्रोटोकॉल प्रमाणे कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली व त्यानुसार सर्व कार्यक्रम घेण्यात आला.प्रमुख अतिथींनी आपल्या मनोगतातून लॉयन्सची कार्यप्रणाली, लॉयन्सचे ध्येय व उद्देश समजावून सांगितले. लॉयन्स किती निस्वार्थ हेतूने सामाजिक , आरोग्य पर्यावरण, शिक्षण क्षेत्रात हे उदाहरण देऊन सांगितले. वैद्यकीय क्षेत्रात सर्वांना परिचित असणारे डॉक्टर वैभव पडोळे यांनी लॉयन्सच्या कार्याची प्रशंसा करताना आपण याचा हिस्सा होणार आहोत याबद्दल आनंद व्यक्त केला, येणाऱ्या काळात चांगले उपक्रम राबविण्याची ग्वाही दिली.

पदग्रहण सोहळ्यात अध्यक्ष म्हणून लायन्स सन्माननीय सिद्दिकी सर यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणून लॉयन्स एड. अरुण आंबेकर व लायन्स कल्याण कुरुंदकर ,सचिव म्हणून बाळासाहेब बेले यांची निवड करण्यात आली. कोषाध्यक्षपदी लॉयन्स संजीव कुमार बेंडके यांची निवड करण्यात आली. सर्वांना आपल्या कार्याप्रती प्रामाणिक राहून चांगले कार्य करण्याची शपथ देण्यात आली. यावर्षी सन्माननीय लॉयन्स एड.दीपक कट्टेकर ,लॉयन्स डॉक्टर सागर सातपुते, लॉयन्स सी.ए.एकनाथ जगताप, लॉयन्स संदीप चव्हाण सर, प्रा. लॉयन्स बाळासाहेब भिंगोले सर, लॉयन्स प्रसन्ना देशपांडे, लॉन्स सचिन गोंडे पाटील ब्रांच मॅनेजर युनियन बँक ऑफ इंडिया वसमत, लॉयन्स गंगाप्रसाद डाके, लॉयन्स राजाराम जगताप यांना नवीन सदस्य म्हणून शपथ देण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने लॉयन्सचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. एड. लायन्स ,अरुण आंबेकर, एड. प्रदीप देशमुख ,लायन डॉक्टर वैभव पडोळे, हरिहर अलसटवार,लॉयन्स,वैजनाथ कदम लॉयन्स विक्रम कुंटूरवार, लायन्स आलोक जाधव , लॉयन्सरोहित टेहरे, लॉयन्स सुहास काकडे, लॉन्स सचिन दगडू , लॉयन्स गौस बागवान लॉयन्स कल्याण कुरुंदकर, लॉयन्स समीर कुरेशी, लॉयन्स संदीप टाक उपस्थित होते.याच कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रात काम करणारे नवीन शेळके व कुरुंदा येथील सह्याद्री टोकाई गड येथे मागील काही वर्षांपासून सुमारे 30हजार वृक्ष लागवड करून उजाड माळ हिरवागार करणारे मंगेश चिमणाजी दळवी यांचा शालव स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब बेले यांनी केले तरआभार प्रदर्शन संजीव बेंडके यांनी केले . कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!