
वसमत / रामु चव्हाण
वसमत शहरातील गुरूद्वार परिसरातील असलेला बडा तलाव मागील वर्षी फुटल्याने शुक्रवार पेठ शहरपेठेतील अनेक नागरिकांचा घरात पाणी शिरून आतोनात नुकसान झाले होते.
हा तलाव फुटल्याने तलावातील पाणी साठवण बंद झाल्याने या भागातील अनेक घरांना असलेल्या बोरवेल ला पाणी येत नसल्याने या भागामध्ये पाणी टंचाई जाणवत आहे. कारण गेली कित्येक वर्षांपासून तलावामध्ये पाणी असल्याने या भागातील बोरवेलला पाणी पातळी ही चांगल्या प्रकारे राहत होती यामुळे या परिसरात आजपर्यंत पाणीटंचाई भासलेली नाही पण मागील वर्षी जुलै महिन्यामध्ये झालेल्या ढगफुटीमुळे गुरुद्वारा परिसरातील तलाव फुटल्याने तलावातील पाणी साठवन बंद झाल्याने य हा तलाव लवकरात लवकर दुरुस्त करावा व येणाऱ्या पावसाळ्यात या तलावात पाणी साठवण जर झाली तर या भागातील अनेक नागरिकांच्या बोरवेलला पाणी पातळी ही चांगल्या प्रकारे राहील यासाठी वसमत नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सुनील भाऊ काळे ,माजी नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार,माजी नगरसेवक राजेश भोसले, तानाजीराव कदम,दिलीप भोसले यांच्यासह या भागातील अनेकानी वारंवार मुख्याधिकारी ,उप विभागीय अधिकारी, तहसीलदार याना वारंवार निवेदन देण्यात आली होती पण यावर कुठलेही करावाही होत नसल्याने वसमत उपविभागाचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी सदरील तलावा संदर्भात तहसीलदार मर्द व जलसंधारण अधिकारी हिंगोली यांची संयुक्त बैठक वसमत उपविभागीय अधिकारी कार्यालयात घेण्यात आली यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी तलाव परिसरात जाऊन पाहणी केली व लवकरात लवकर ज्या ठिकाणी हा तलाव फुटलेला आहे या ठिकाणी तो बुजवून पाणी साठवण व्यवस्था लवकरात लवकर करण्यात येईल असे आश्वासन दिल्याची माहिती शिवसेनेचे हिंगोली जिल्हा सहसंपर्कप्रमुख सुनील भाऊ काळे यांनी दिली आहे यामुळे हजारो घरांना पाण्याचा लाभ या तलावामुळे होणार असल्याचे सुनील भाऊ काळे यांनी सांगितले त्यामुळे लवकरात लवकर हा तलाव दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.