
वसमत / रामु चव्हाण
वसमत तालुक्यातील साल सन २०२५-२०३० या कालावधीतील सार्वत्रीक ग्रामपंचायतीकरीता वसमत तालुक्यातील ११९ ग्रामपंचायतीचे सरपंच पदे अनुसूचित जाती, अनुसुचीत जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला राखीव करीता सोडत पध्दतीने आरक्षित करण्यासाठी मा. उपविभागीय अधिकारी विकास माने , वसमत यांना प्राधिकृत करण्यात आलेले आहे. तसेच तहसीलदार शारदाताई दळवी यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली
त्यानुसार अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला राखीव करीता सरपंच पद सोडत पध्दतीने आरक्षित कार्यक्रम दिनांक २ जुलै २०२५ रोजी आज कै. सुरमणी दत्ता चौंगुले नाटयगृह, वसमत येथे आयोजीत करण्यात आला होता.
खालील प्रमाणे सोडत