वसमत मध्ये अवैध गॅस भरणा केंद्रावर पुरवठा विभागाची धा
वसमत/ रामु चव्हाण
वसमत शहरामध्ये मागील काही दिवसांमध्ये पासून अवैध वाहना मध्ये अवैध गॅस भरणा केंद्राचा सुळसुळाट झाला आहे.
ही माहिती तहसीलदार शारदा दळवी यांना कळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाच्या पथकाने आज दुपारी दोन वाजता अवैध गॅस भरणा केंद्रावर धाड टाकली
यामध्ये आठ घरगुती गॅस सिलेंडर तसेच एक व्यवसाय सिलेंडर असे 9 सिलेंडर जप्त करण्यात आले सोबत एक वजन काटा, तसंच गॅस ट्रान्सफर करण्यासाठी गॅस रिफ्लिंगच्या तीन मशीन एक ऑटो मुद्देमाल असा एकूण 1,83,356 रुपये चा मुद्देमाल अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या हाती लागला
यामध्ये गॅस भरणा केंद्रावर एक ऑटो मध्ये गॅस भरत असताना रंगेहात पकडण्यात आले आहे
या पथकाची ही वसमत शहरात पहिलीच कारवाई असून अवैध गॅस भरणा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत
वसमत तहसीलदार शारदा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पूर्ण करण्यात आली यामध्ये नायब तहसीलदार पांडुरंग हांडे पुरवठा निरीक्षक बालाजी बोखारे यांच्या टीमने धडक कारवाई केली. सदरील प्रकरणी वसमत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.