आपला जिल्हा

वसमत उपविभाग स्तरीय समितीवर अशासकीय सदस्य म्हणून मारिअण्णा वाघमारे व अजयसिंग चव्हाण यांची नियुक्ती! अधिकारी यांच्या आदेशाने निवड; नियुक्तीनंतर दोन्ही सदस्यांकडून शासनाचे आभार

मुख्य संपादक रामू चव्हाण

वसमत उपविभाग स्तरीय समितीवर अशासकीय सदस्य म्हणून मरिअण्णा वाघमारे व अजयसिंग चव्हाण यांची नियुक्ती!
अधिकारी यांच्या आदेशाने निवड; नियुक्तीनंतर दोन्ही सदस्यांकडून शासनाचे आभार

वसमत CT NEWS

वसमत (प्रतिनिधी):
भटके-विमुक्त समाजाचा विकास, त्यांच्या समस्यांचे निवारण तसेच त्यांच्यावर होणारे अमानवीय अत्याचार व अन्यायकारक घटनांना आळा घालण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे.

याच पार्श्वभूमीवर, उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, वसमत यांच्या अधिकृत आदेशान्वये वसमत उपविभाग स्तरीय समितीवर अशासकीय सदस्य म्हणून श्री. मरिअण्णा नर्सिंग अण्णा वाघमारे आणि श्री. अजयसिंग सुभाषसिंग चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या दोन्ही नियुक्त्यांचे अधिकृत आदेश उपविभागीय अधिकारी (विकास माने) यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले असून, या निवडीमुळे तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दोन्ही सदस्यांनी मानले शासनाचे आभार “शासनाने आमच्या कार्यक्षमतेवर आणि समाजबांधिलकीवर विश्वास ठेवून ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. या समितीच्या माध्यमातून भटके-विमुक्त समाजातील शेवटच्या घटकाचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू,” अशी भावना व्यक्त करत
श्री. मरिअण्णा वाघमारे व श्री. अजयसिंग चव्हाण यांनी राज्य शासन व प्रशासनाचे जाहीर आभार मानले आहेत.
समाजाच्या प्रश्नांना मिळणार न्याय
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शासन निर्णयानुसार, राज्य, जिल्हा व उपविभाग स्तरावर या समित्या गठीत करण्यात येत आहेत. वसमत उपविभागातील भटके-विमुक्त समाजाच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडणे, समाजाचा विकास करणे आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण करणे हा या समितीचा मुख्य उद्देश आहे. या दोन सुशिक्षित आणि अभ्यासू सदस्यांच्या नियुक्तीमुळे प्रशासकीय स्तरावर समाजाचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील, असा विश्वास व्यक्त होत आहे.सर्व स्तरातून कौतुक
या नियुक्तीच्या आदेशाच्या प्रती जिल्हाधिकारी (हिंगोली), तहसीलदार (वसमत/औंढा), उपविभागीय पोलीस अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांना माहिती व पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. मरिअण्णा वाघमारे आणि अजयसिंग चव्हाण यांच्या या निवडीमुळे वसमत व परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!