आपला जिल्हा

हिंगोलीत सराईत मोटारसायकल चोर गजाआड; ३ दुचाकी जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

मुख्य संपादक रामू चव्हाण

हिंगोलीत सराईत मोटारसायकल चोर गजाआड; ३ दुचाकी जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

मुख्य संपादक
रामू चव्हाण

हिंगोली:
हिंगोली शहरातून दुचाकी चोरणाऱ्या एका १९ वर्षीय सराईत चोराला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. त्याच्याकडून २ लाख ५० हजार रुपये किमतीच्या ३ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, हिंगोली शहर पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. सतीश लक्ष्मण पोटे (वय १९ वर्षे, रा. जलाल धाबा, ता. औंढा नागनाथ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि चोरट्यांचा शोध घेण्यासाठी हिंगोलीचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या होत्या.
कयाधू नदीच्या पुलाजवळ सापळा
२५ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला एक गोपनीय माहिती मिळाली. आरोपी सतीश पोटे याने हिंगोली शहरातून काही मोटारसायकल चोरल्या असून, तो त्या विकण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने हालचाली करत कयाधू नदीच्या पुलाजवळ नाकाबंदी केली. संशयास्पदरीत्या आढळलेल्या सतीश पोटे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली.
अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने हिंगोली शहरातील वेगवेगळ्या भागांतून ३ मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून पुढील ३ दुचाकी जप्त केल्या आहेत:
MH 38 T 6065 (हिरो कंपनी)
MH 38 S 7009 (हिरो कंपनी)
विना क्रमांकाची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल
या जप्त केलेल्या तिन्ही दुचाकींची एकूण किंमत तब्बल २ लाख ५० हजार रुपये आहे. या कारवाईमुळे हिंगोली शहर पोलीस ठाण्यातील दुचाकी चोरीचे २ गुन्हे उघडकीस आले आहेत.
या पथकाने केली कामगिरी
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार भुजंग कोकरे, गजानन पोकळे, शिवाजी जालमिरे, साईनाथ कंठे, नरेंद्र साळवे, ज्ञानेश्वर गारे आणि हरिभाऊ गुजंकर यांच्या पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!