आपला जिल्हा

वसमतकरांना अंधारात ढकलणारा महावितरणचा गलथान कारभार खपवून घेणार नाही! कन्हैया बाहेती, इम्रान शेख आणि नगरसेवकांचा वीज अधिकाऱ्यांना थेट ‘शॉक’; महावितरणला धरले धारेवर!

संपादक हरनामसिंग चव्हाण

वसमतकरांना अंधारात ढकलणारा महावितरणचा गलथान कारभार खपवून घेणार नाही! कन्हैया बाहेती, इम्रान शेख आणि नगरसेवकांचा वीज अधिकाऱ्यांना थेट ‘शॉक’; महावितरणला धरले धारेवर!

वसमत (प्रतिनिधी):

गेल्या काही दिवसांपासून वसमत शहरात महावितरणचा (MSEB) कारभार अत्यंत सुमार आणि गलथान झाला आहे. दिवस असो की रात्र, कधीही आणि कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय तासनतास वीज खंडित होण्याचे सत्र सुरू आहे. या ‘रात्री-बेरात्री’च्या वीज गुल होण्याच्या त्रासाला वसमतकर नागरिक पुरते कंटाळले आहेत. जनतेच्या याच तीव्र संतापाचा स्फोट आज महावितरणच्या कार्यालयात पाहायला मिळाला. वसमतकरांना नाहक होणारा हा त्रास आता सहन केला जाणार नाही, असा सज्जड दम देत आज लोकप्रतिनिधींनी आणि कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरले.
अधिकाऱ्यांची बोलती बंद, संतप्त लोकप्रतिनिधींचा थेट हल्लाबोल
वसमत नगर परिषद अध्यक्ष प्रतिनिधी कन्हैयाभाऊ बाहेती, नगर उपाध्यक्ष इम्रान शेख, आणि नगरसेवक सचिनभाऊ दगडू नगरसेवक ,धनंजय गोरे नगरसेवक, संकेत नामपली,राजू येंगडे यांच्यासह अनेक आक्रमक कार्यकर्त्यांनी आज महावितरणचे कार्यालय गाठले. वीज खंडित होण्याच्या वाढत्या तक्रारींवरून त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.
“रात्री-बेरात्री वीज गेल्यामुळे लहान मुले, वृद्ध आणि नागरिक प्रचंड उकाड्याने व डासांमुळे त्रस्त आहेत. नागरिक नियमित वीजबिल भरतात, मग त्यांना हा त्रास का? महावितरणचा हा गलथान कारभार आम्ही वसमतमध्ये चालू देणार नाही,”* अशा कडक शब्दांत कन्हैया बाहेती यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.

‘…तर उग्र आंदोलन करू!’
नगर उपाध्यक्ष इम्रान शेख आणि नगरसेवक सचिन दगडू यांनीही अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारावर तीव्र आक्षेप घेतला. वीज खंडित होण्याचे प्रमाण तात्काळ थांबले नाही आणि वसमतकरांना अखंडित वीज पुरवठा मिळाला नाही, तर यापुढे केवळ जाब विचारणार नाही, तर महावितरण प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी लोकप्रतिनिधींनी दिला.
वसमतकरांच्या हक्कासाठी लोकप्रतिनिधी मैदानात
आजच्या या धडक कारवाईमुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. अखेर, वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तात्काळ उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.
वसमतकरांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या सुटकेसाठी लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेचे संपूर्ण शहरातून स्वागत होत असून, आता तरी महावितरणला ‘शॉक’ बसून शहरातील लाईट जाणे बंद होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या आंदोलनात वसमत शहरातील अनेक प्रमुख कार्यकर्ते आणि त्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!