आपला जिल्हा

कुरुंदा येथे संगीतमय श्रीमद् भागवत कथा व पंचावतार उपहार सोहळ्याची सांगता

संपादक हरनामसिंग चव्हाण

कुरुंदा येथे संगीतमय श्रीमद् भागवत कथा व पंचावतार उपहार सोहळ्याची सांगता

वसमत (विशेष प्रतिनिधी):

पुरुषोत्तम (अधिक) मास निमित्ताने कुरुंदा येथील सह्याद्री लॉन्स, वरद प्रसाद मंगल कार्यालय परिसरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘संगीतमय श्रीमद् भागवत कथा, पंचावतार उपहार व सत्कार समारंभाची’ रविवारी (दि. ३१ मे) भक्तीमय वातावरणात सांगता झाली. सोमवार, दि. २५ मे पासून सुरू झालेल्या या सप्ताहात हजारो भाविकांनी भागवत कथेचा श्रवणानंद घेतला.
भव्य पालखी सोहळ्याने झाली होती सुरुवात
या धार्मिक महोत्सवाची सुरुवात सोमवार, दि. २५ मे रोजी सकाळी ठीक ७:०० वाजता संस्थान श्री फुलारी मंदिर ते वरद प्रसाद मंगल कार्यालय (कुरुंदा) दरम्यान काढण्यात आलेल्या भव्य पालखी सोहळ्याने झाली होती.
भागवताचार्यांचे प्रबोधन व सत्कार सोहळा
सप्ताहादरम्यान विख्यात भागवताचार्य कवीश्वर कुळभूषण आचार्य प्रवर चिरडे बाबाजी (महानुभाव) यांच्या रसाळ वाणीतून संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे निरूपण करण्यात आले. तसेच या सोहळ्यात कवीश्वर कुळाचार्य आचार्य प्रवर महंत कारंजेकर बाबा (अमरावती, अध्यक्ष, अखिल भारतीय महानुभाव परिषद) हे प्रामुख्याने सत्कारमूर्ती म्हणून उपस्थित होते, त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
प्रमुख राजकीय नेत्यांची उपस्थिती
या सोहळ्याला राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या. यामध्ये वसमत विधानसभेचे आमदार श्री राजुभैय्या (चंद्रकांत) नवघरे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून दर्शन घेतले व आयोजकांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
धोंडे जेवणाच्या महाप्रसादाने सांगता
अधिक मासाचे औचित्य साधून रविवार, दि. ३१ मे रोजी दुपारी १२:०० वाजल्यापासून भव्य ‘धोंडे जेवणाचा’ (महाप्रसाद) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या महाप्रसादाचा लाभ कुरुंदा व परिसरातील हजारो भाविक, नागरिक आणि कार्यकर्त्यांनी घेतला.
यशस्वीतेसाठी परिश्रम
या संपूर्ण धार्मिक सोहळ्याचे भव्य आयोजन श्री आशीर्वाद इंगोले पाटील (विधानसभा अध्यक्ष: राष्ट्रवादी युवक काँग्रेस, वसमत व जिल्हा परिषद, कुरुंदा सर्कल) यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिसरातील समस्त नागरिकांनी व सहकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. या सोहळ्यामुळे कुरुंदा परिसरात संपूर्ण आठवडाभर भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!