आपला जिल्हा

बसमतच्या आयुष गोरेचे ‘जेईई ॲडव्हान्स्ड’ परीक्षेत घवघवीत यश; आयआयटी प्रवेशाचे स्वप्न साकार!

संपादक हरनामसिंग चव्हाण

बसमतच्या आयुष गोरेचे ‘जेईई ॲडव्हान्स्ड’ परीक्षेत घवघवीत यश; आयआयटी प्रवेशाचे स्वप्न साकार!

वसमत CT NEWS

बसमत (प्रतिनिधी):
देशातील सर्वात प्रतिष्ठेच्या आणि अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) प्रवेशासाठीच्या ‘जेईई ॲडव्हान्स्ड’ (JEE Advanced) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यात बसमतचा गुणवंत विद्यार्थी आयुष मारोती गोरे याने घवघवीत यश संपादन केले आहे. या आव्हानात्मक परीक्षेत त्याने ऑल इंडिया रँक (AIR) २६९६ मिळवून देशातील अव्वल संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्याचे आपले स्वप्न साकार केले आहे.
‘जेईई ॲडव्हान्स्ड’ ही परीक्षा अत्यंत कठीण समजली जाते. देशातील लाखो विद्यार्थ्यांमधून कठोर परिश्रम आणि अचूक नियोजनाच्या बळावर आयुषने हे यश खेचून आणले आहे. त्याच्या या देशपातळीवरील कामगिरीमुळे केवळ गोरे परिवाराचेच नव्हे, तर संपूर्ण परिसराचे नाव उज्ज्वल झाले आहे.
सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव
आयुषने मिळवलेल्या या अभूतपूर्व यशामुळे त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. त्याचे आजी-आजोबा, आई-वडील, काका-काकू, मामा-मामी आणि मित्र परिवाराकडून त्याचे पेढे भरवून तोंड गोड करण्यात आले, तसेच पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या.
“आयुषने अत्यंत प्रामाणिकपणे आणि कष्टाने अभ्यास केला. त्याचे आयआयटीमध्ये जाण्याचे स्वप्न आज पूर्ण होत असल्याचा आम्हास सार्थ अभिमान आहे,” अशी भावना त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.
आयुषच्या या यशाबद्दल त्याचे मित्र, नातेवाईक आणि समाजातील प्रतिष्ठित नागरिकांकडून प्रत्यक्ष भेटून व सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!