आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

हिंगोलीत पोलिसांची मोठी कारवाई; १० लाख ६ हजारांचा अवैध गुटखा व मुद्देमाल जप्त, आरोपी फरार!

मुख्य संपादक रामु चव्हाण

वसमत /रामु चव्हाण
हिंगोली:हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेअंतर्गत आज, २१ मे २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास हिंगोली शहर परिसरात अवैध गुटखा विक्री करणाऱ्यावर मोठी कारवाई करण्यात आली असून, तब्बल १० लाख ६ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुपितावरून छापा अन् आरोपीचा पोबारा
मिळालेल्या माहितीनुसार, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. कमलेश मीना यांच्या विशेष पथकाला गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, प्रॉपर हिंगोली शहरातील पेन्शनपुरा भागातील सूर्यमुखी हनुमान मंदिराजवळ एक इसम पांढऱ्या रंगाच्या कारमधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्री करत आहे.
या माहितीच्या आधारे विशेष पथकाने आज सकाळी ०५:४५ वाजताच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकला. पोलिसांना पाहताच आणि त्यांनी कार थांबवण्याचा इशारा केला असता, चालकाने आपली कार पोलीस कर्मचाऱ्यांपासून थोड्या अंतरावर उभी केली. त्यानंतर त्याने गल्ली-बोळाचा आणि अंधाराचा फायदा घेत तिथून पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला, परंतु तो पळून जाण्यात यशस्वी ठरला.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल
पोलिसांनी घटनास्थळावरून खालील मुद्देमाल जप्त केला आहे:
१) कार: एक पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी फ्रॉक्स (Maruti Suzuki Fronx) कार (किंमत ₹८,००,०००/-)
२) मोबाईल: एक काळसर रंगाचा विवो (Vivo) कंपनीचा मोबाईल (किंमत ₹१५,०००/-)
३) गुटखा: प्रतिबंधित सुगंधित गुटखा (किंमत ₹१,९१,६८०/-)
एकूण जप्त मुद्देमाल: ₹१०,०६,६८०/- (दहा लाख सहा हजार सहाशे ऐंशी रुपये)
गुन्हा दाखल
याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुरनं ३४९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २७४, २७५ आणि अन्न सुरक्षा अधिनियम २००६ चे सहकलम २६(२)(i), २६(२)(iv), २७(२)(e), ३०(२)(a) ५९ नुसार फरार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई करणारे पोलीस पथक
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन आणि अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या थेट मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील खालील पोलीस अंमलदारांनी केली आहे:
पोह/६९७ संदीप पवार
पोशि/४४२ विनोद कुटे
पोशि/८९१ सतिश नरवाडे
पोशि/८३८ सुमित टाले
पोशि/२८० अर्जुन सुर्यवंशी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!