आपला जिल्हासामाजिक
श्री.ष.ब्र.१०८ वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त गोशाळेस पशुखाद्याचे वाटप
रामु चव्हाण

वसमत / रामु चव्हाण
थोरला मठ संस्थान वसमतचे मठाधिपती श्री.ष.ब्र.१०८ वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज ( बापू ) यांच्या वाढदिवसानिमित्त कामधेनू गोशाळा नांदेड रोड वसमत जिंतुर टि पाईंनट येथे प.पु सद्गुरू युवा संत श्री ष.ब्र १०८ दिगंबर शिवाचार्य महाराज वसमतकर यांच्या शुभहस्ते पशुखाद्य वाटप करण्यात आले.
यावेळी महाराजांच्या हस्ते गोशाळा सेवेकरी अवचार यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी नागोराव नरवाडे थोरावा, सखाराम नरवाडे, खंडु नरवाडे, महेश नरवाडे, त्र्यंबक नरवाडे ( उपसरपंच गुंज), दिपक नरवाडे, शिवराज शेवाळकर, शिवराज नरवाडे, गोशाळा सेवेकरी अवचार,दता (राजु) नरवाडे इत्यादी नागरिक उपस्थित होते.