आपला जिल्हाराजकीय
जवळा बु येथे विविध विकास कामांचे आ.राजु भैय्या नवघरे यांच्याहस्ते भूमीपूजन
रामु चव्हाण

वसमत/ रामु चव्हाण
वसमत तालुक्यातील जवळा बुद्रुक येथे विविध विकास योजनेअंतर्गत ,आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते विविध कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न नुकताच संपन्न झाला,
वसमत तालुक्यातील जवळा बु, ग्रामपंचायत मध्ये , मागील अनेक दिवसापासून गावातील समस्या व अनेक विकास कामापासून गाव कोसो दूर होते, परंतु आज वसमत तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजू भैया नवघरे यांनी जवळा बुद्रुक ग्रामपंचायत मध्ये गावातील रस्ते स्मशानभुमी समाज मंदिर आहेरवाडी ते जवळा रस्त्याचे काम, गावातील सिमेंट रस्त्याचे काम,डोळ्याच्या शिबिरातील रुग्णांना भेट अशा अनेक कामांचा लोकार्पण सोहळा आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते संपन्न झाला, या कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यंकटराव जवळेकर पाटील, आयोजक सरपंच भारत नामदेव जाधव उपसरपंच ज्ञानेश्वर बेंडे व ग्रामपंचायत सदस्य,या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तानाजी राव बेंडे पाटील, त्रंबक कदम रोडगेकर मार्केट कमिटीचे संचालक शिंदे साहेब व गावातील ज्येष्ठ व श्रेष्ठ मंडळी ,आशा वर्कर महिला बचत गट गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,
छाया नागेश चव्हाण वसमत 🙏🏻👇🏻
MLA RAJU NAVGHARE BASMAT HINGOLI ,NCP BASMATH,