आपला जिल्हा

वसमतमध्ये श्रीमद भागवत कथेचा अभूतपूर्व उत्साह; कलश यात्रेला भक्तांचा जनसागर!

संपादक हरनामसिंग चव्हाण

वसमतमध्ये श्रीमद भागवत कथेचा अभूतपूर्व उत्साह; कलश यात्रेला भक्तांचा जनसागर!

वसमत (हिंगोली):

येथील नवा मोंढा भागातील गोविंद्रा ग्रँड बँकेट हॉल येथे अधिकमासाच्या पावन पर्वावर भव्य ‘श्रीमद भागवत कथा’ ज्ञानयज्ञाचे अत्यंत भक्तीमय वातावरणात आयोजन करण्यात आले आहे. या कथेचा शुभारंभ बुधवार, दिनांक ०३ जून २०२६ रोजी भव्य व नयनरम्य ‘कलश यात्रेने’ झाला. या कलश यात्रेमध्ये माता-भगिनी आणि भाविक भक्तांचा अक्षरशः जनसागर उसळला होता.
हरिद्वारचे सुप्रसिद्ध कथा व्यास परमपूज्य श्री युवराज स्वामी श्री दामोदraचार्यजी महाराज यांच्या अमृतवाणीतून या श्रीमद भागवत कथेचे रसपान भाविकांना लाभत आहे. बुधवार सकाळी ०८:३१ वाजता मोढा येथील हनुमान मंदिरापासून या भव्य कलश यात्रेला सुरुवात झाली. ही यात्रा मुख्य मार्गावरून जात गोविंद्रा ग्रँड बँकेट हॉल येथे पोहोचल्यानंतर कथेचे विधीवत पूजन करून कथेचा प्रारंभ झाला.
भव्य कलश यात्रा आणि भक्तांचा उत्साह:
कलश यात्रेदरम्यान संपूर्ण वसमत शहर भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले होते. पारंपारिक वेशभूषेत, डोक्यावर कलश धारण केलेल्या शेकडो महिला आणि भजनात तल्लीन झालेले भाविक यामुळे वातावरण अत्यंत मंगलमय झाले होते. ‘जय श्री कृष्ण’, ‘गोविंद गोपाळ’ च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
कथेची वेळ आणि महाप्रसाद:
हा कथा सोहळा बुधवार दि. ०३ जून २०२६ पासून सुरू झाला असून, मंगळवार दिनांक ०९ जून २०२६ पर्यंत चालणार आहे. कथेची वेळ दररोज दुपारी ०३:०० ते संध्याकाळी ०६:०० वाजेपर्यंत असून, शेवटच्या दिवशी म्हणजेच ९ जून रोजी भव्य समाप्ती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या अध्यात्मिक सोहळ्याचे मुख्य आयोजक जगदीशप्रसाद संतोषकुमार बाहेती असून विनीत बालाप्रसाद सीतारामजी बाहेती व समस्त बाहेती परिवार, वसमत आहेत. या सुवर्णसंधीचा आणि कथेचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले असून, पहिल्याच दिवसापासून वसमत व परिसरातील हजारो भाविकांनी कथेसाठी अलोट गर्दी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!