वसमतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची उद्या ‘महत्त्वपूर्ण आढावा बैठक’; आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी रणशिंग फुकणार!
संपादक: हरनामसिंग चव्हाण

- वसमतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची उद्या ‘महत्त्वपूर्ण आढावा बैठक’; आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी रणशिंग फुकणार!
वसमत CT NEWS
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी आणि संघटनात्मक बांधणीला गती देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, वसमत तालुका यांच्या वतीने उद्या, शनिवार दिनांक ६ जून २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता एका विशेष आणि महत्त्वपूर्ण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून वसमत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. राजु भैया नवघरे उपस्थित राहणार असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी निवडणुकांची रणनीती आखली जाणार आहे. तसेच बैठकीला मा. अनिल पतंगे (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, हिंगोली) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
बैठकीचा मुख्य विषय:
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि बुथ अध्यक्ष निवडी संदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन पुढील दिशा ठरवली जाईल. संघटनात्मक दृष्ट्या ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
बैठकीचे नियोजन:
दिनांक: ६ जून २०२६ (वार: शनिवार)
वेळ: सकाळी ठीक ११:०० वाजता
स्थळ: कै. गोपाळराव पाटील ग्रामीण महाविद्यालय, वसमत. (पडोळे कॉम्प्लेक्स, बहिर्जी कॉलेज रोड) वसमत.
पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी, विविध सेलचे अध्यक्ष, आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि सर्व क्रियाशील कार्यकर्त्यांनी या बैठकीला बहुसंख्येने व वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन विनीत श्री. विश्वनाथराव फेगडे (तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, तथा वसमत, संचालक, पूर्णा सह. सा. का. वसमत) यांनी केले आहे.



