आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

कौडगाव येथील ७ दिवसांच्या चिमुकलीवर मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया; आमदार राजूभैय्या नवघरे ठरले देवदूत!

संपादक हरनामसिंग चव्हाण

कौडगाव येथील ७ दिवसांच्या चिमुकलीवर मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया; आमदार राजूभैय्या नवघरे ठरले देवदूत!

वसमत (CT NEWS प्रतिनिधी):

“राजकारणापेक्षा माणुसकी मोठी… आणि माणुसकी जपणारा नेता म्हणजेच राजूभैय्या नवघरे!” या वाक्याची प्रचिती देणारी एक अत्यंत संवेदनशील आणि कौतुकास्पद घटना वसमत तालुक्यात समोर आली आहे. कौडगाव येथील एका ७ दिवसांच्या चिमुकलीसाठी वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार श्री. राजूभैय्या नवघरे हे खऱ्या अर्थाने देवदूत बनून धावून आले आहेत. त्यांच्या तत्परतेमुळे आणि आर्थिक पाठबळामुळे या चिमुकलीवर मुंबईतील नामांकित रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून तिला नवजीवन मिळाले आहे.
चिमुकलीची प्रकृती होती अत्यंत गंभीर
तालुक्यातील कौडगाव येथील रहिवासी गौतम भंडारे यांच्या घरात एका गोंडस मुलीचा जन्म झाला, परंतु जन्मानंतर अवघ्या ७ दिवसांतच तिच्यावर काळाने घाला घातला. चिमुकलीच्या हृदयात छिद्र असल्याचे समोर आले, तसेच तिच्या शरीरात रक्तपुरवठा करणारी मुख्य नस दबली गेल्याने तिची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. एका गरीब कुटुंबावर कोसळलेले हे संकट पाहून संपूर्ण गाव चिंताग्रस्त झाले होते.
क्षणाचाही विलंब न करता ‘भैय्या’ धावले मदतीला
या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गावातील सामाजिक कार्यकर्ते पप्पू भोंग व ग्रामस्थांनी तातडीने या कुटुंबाला आमदार राजूभैय्या नवघरे यांच्याकडे आणले. परिस्थिती ऐकताच, आमदार नवघरे यांनी राजकारण आणि इतर सर्व कामे बाजूला ठेवून क्षणाचाही विलंब न करता हालचाली सुरू केल्या. त्यांनी तात्काळ त्या चिमुकलीला पुढील उपचारासाठी मुंबई येथील प्रसिद्ध ‘कोकिळाबेन हॉस्पिटल’ मध्ये पाठवण्याची व्यवस्था केली.
उपचाराचा संपूर्ण खर्च उचलून दाखवली माणुसकी
मुंबईसारख्या शहरात कोकिळाबेन रुग्णालयातील उपचाराचा खर्च या गरीब कुटुंबाच्या आवाक्याबाहेरचा होता. मात्र, आमदार राजूभैय्या नवघरे यांनी ‘मोठ्या भावाच्या’ नात्याने पाऊल उचलत या चिमुकलीच्या उपचारासाठी लागणारा सर्व आवश्यक आर्थिक खर्च स्वतः उपलब्ध करून दिला.
शस्त्रक्रिया यशस्वी; पंचक्रोशीतून कृतज्ञता
आमदार साहेबांच्या या तातडीच्या मदतीमुळे आज मुंबईत त्या चिमुकलीची अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आहे. डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले असून चिमुकलीच्या नवजीवनाची आशा आता पूर्णपणे बळकट झाली आहे.
एखाद्याच्या डोळ्यातील अश्रू पुसून त्याला जगण्याची नवी उमेद देणे, यालाच खऱ्या अर्थाने ‘लोकप्रतिनिधित्व’ म्हणतात. एका निष्पाप जीवाचे प्राण वाचवून तिच्या आयुष्याला नवी दिशा देणाऱ्या आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या या माणुसकीपूर्ण आणि संवेदनशील कार्याने कौडगावसह संपूर्ण वसमत पंचक्रोशी हेलावून गेली असून, सर्व स्तरांतून भैय्यांवर कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा वर्षाव होत आहे!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!