आरोग्य व शिक्षण

हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयाचा ‘दहावी’त डंका; गुणवंतांचा जयप्रकाशजी दांडेगावकर साहेबांच्या हस्ते गौरव!

संपादक: हरनामसिंग चव्हाण

🎓 हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयाचा ‘दहावी’त डंका; गुणवंतांचा जयप्रकाशजी दांडेगावकर साहेबांच्या हस्ते गौरव!

वसमत CT NEWS संपादक हरनामसिंग चव्हाण

वसमत येथील नामांकित शैक्षणिक संस्था हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयाने इयत्ता दहावीच्या निकालात आपली उज्वल यशाची परंपरा यंदाही कायम राखली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या फेब्रुवारी/मार्च २०२६ च्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत विद्यालयाचा निकाल ८८.९३% लागला असून, ३२ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. या सर्व गुणवंतांचा आणि त्यांच्या पालकांचा संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.
📊 निकालाची ठळक वैशिष्ट्ये
एकूण प्रविष्ठ विद्यार्थी ७९५
एकूण उत्तीर्ण विद्यार्थी ७०७
विशेष प्राविण्य (Distinction) १८७ विद्यार्थी
प्रथम श्रेणी २४० विद्यार्थी
द्वितीय श्रेणी १९४ विद्यार्थी
९०% पेक्षा जास्त गुण मिळवणारे ३२ विद्यार्थी
🏆 विद्यालयाचे ‘टॉप थ्री’ मानकरी:
1)रुद्र बंबरुळे ९८.८०% (विद्यालयात प्रथम)
2)संस्कृती दासे ९८% (विद्यालयात द्वितीय)
3)अक्षरा पिसाळ ९७.४०% (विद्यालयात तृतीय)
तसेच आर्या नायक, समीक्षा कदम, संध्या जाधव (प्रत्येकी ९६.२०%), भक्ती दैफळे (९६%), वैष्णवी गरुड (९५.८०%) यांसह अनेक विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांची मोहोर उमटवली आहे.
सोहळा आणि मार्गदर्शन
विद्यालयाच्या या देदीप्यमान यशाबद्दल आयोजित सत्कार समारंभात संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब, सचिव आदरणीय पंडितराव देशमुख सर, ज्येष्ठ संचालक रामचंद्र बागल साहेब, श्री. पंडितराव सारंग, माजी मुख्याध्यापक बी.एस. खिल्लारे सर आणि मुख्याध्यापक पी.जी. शेळके सर यांच्या हस्ते विद्यार्थी व पालकांना सन्मानित करण्यात आले. “विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण कष्ट आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे,” असे गौरवोद्गार मान्यवरांनी यावेळी काढले.
🤝 उपस्थित मान्यवर:
या कार्यक्रमाला उपमुख्याध्यापक जी.आर. आरकीलवाड सर, पर्यवेक्षिका श्रीमती एस.व्ही. जाधव मॅडम, पर्यवेक्षक डी.आर. बागल सर, के.बी. वायचाळ सर यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके संचलन सांस्कृतिक विभागाचे श्री. एस.पी. देशमुख यांनी केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस संस्थेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
शालेय प्रसिद्धी विभाग,
हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालय, वसमत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!