स्व. प्रकाशराव शेषराव ढोणे यांच्या ७० व्या जयंतीनिमित्त पांगरा येथे विद्यार्थी व नवनियुक्त शासकीय सेवकांचा सत्कार सोहळा आयोजित
संपादक हरनामसिंग चव्हाण

स्व. प्रकाशराव शेषराव ढोणे यांच्या ७० व्या जयंतीनिमित्त पांगरा येथे विद्यार्थी व नवनियुक्त शासकीय सेवकांचा सत्कार सोहळा आयोजित
वसमत (विशेष प्रतिनिधी):
येथील जवळच असलेल्या पांगरा येथे स्व. प्रकाशराव शेषराव ढोणे यांच्या ७0 व्या जयंतीचे औचित्य साधून उद्या, शनिवार दिनांक ६ जून २०२६ रोजी एका विशेष गौरव व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सामाजिक उपक्रमांतर्गत गावातील गुणवंत विद्यार्थी आणि देशसेवेसाठी निवड झालेल्या तरुणांचा सन्मान केला जाणार आहे.
या कार्यक्रमात नुकत्याच जाहीर झालेल्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून मोफत शैक्षणिक बॅगचे वाटप करण्यात येणार आहे.
तसेच, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शासकीय सेवेत यश मिळवलेल्या पांगरा गावातील सुपुत्रांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये आरोग्य सेवक, भारतीय सैन्य दल (आर्मी) आणि इतर शासकीय सेवांमध्ये नुकतीच निवड होऊन रुजू झालेल्या नवनियुक्त कर्मचाऱ्यांचा जाहीर सत्कार करून त्यांना सन्मानित केले जाईल.
गावकऱ्यांचा पुढाकार:
या कौतुकास्पद सोहळ्याचे आयोजन आयोजक श्री. प्रशांत प्रकाशराव ढोणे, श्री. उत्तम शेषराव ढोणे आणि समस्त गावकडी मंडळी, पांगरा यांच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पांगरा परिसर आणि तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



