वसमत तालुक्यात मराठा आरक्षणाची धग दिवसेंदिवस वाढत असून जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलने सुरूच राहणार असल्याचा निर्धार वसमत तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला आहे गेली तीन दिवसांपासून वसमत तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा धडकत आहे वसमत तालुक्यातील हजारो महिला तरुणी तरुण या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत तसेच कुरुंदा येथे स्मशानभूमीमध्ये गेली सहा दिवसांपासून सात तरुण अमरण उपोषणाला बसलेले आहेत तर अकोली येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षणावर बहिष्कार टाकला असून शाळेत न जाण्याचा निर्धार यावेळी केला आहे .गिरगाव येथे सात जण गेली पाच दिवसांपासून आमरण उपोषणास बसले आहेत पण शासनाचे याची दखल न घेतल्यामुळे जोपर्यंत जिल्हाअधिकारी उपोषण स्थळी येऊन भेट देत नाहीत तोपर्यंत आपण औषधोपचार घेण्यास उपोषणकर्त्यांनी नकार दिला असल्याची माहिती उपोषण कर्ते प्रमोद नादरे यांनी दिली आमच्या भावना शासनांपर्यंत पोहोचाव्यात व आम्ही करत असलेले उपोषणाची साधी दखल सुद्धा प्रशासन घेत नाही यामुळे जोपर्यंत माननीय जिल्हाधिकारी उपोषणास्थळी येत नाहीत तोपर्यंत आपण स्वतः कुठल्याही औषधोपचार घेणार नसल्याचा त्यांनी वसमत सिटी न्युज बोलताना सांगितले . यावेळी त्यांच्यावर उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सनाउल्ला खान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी औषध उपचार देण्यात येत आहेत पण एका उपोषणकर्त्यांनी जोपर्यंत जिल्हाधिकारी येणार नाहीत तोपर्यंत आपण कुठलेही औषधी उपचार घेण्यास व रुग्णालयात उपचारासाठी जाण्यास नकार दिला असल्याचे सांगितले त्यामुळे गिरगाव येथील उपोषणकर्त्यांची प्रकृती खालवली असून लवकरात लवकर जिल्हाधिकारी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन यातून मार्ग काढावा अशी मागणी होत आहे.