भारतरत्न लता मंगेशकर ऑडिटोरियम मिरा रोड मुंबई या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिका-यांना प्रमुख पाहुण्यांचे हस्ते मोमेंटो देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले जादुई नगरीतील फिल्म डायरेक्टर – पंकज रैना, राईटर प्रोड्युसर – विकास कपूर, वाईस आर्टिस्ट – शक्ती सिंग, म्युझिक डायरेक्टर – रवी पवार, अभिनेता – गुलशन पांडे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाचे आयोजक अनिलकुमार शिंपी-फिल्म डायरेक्टर भारत सिने युग प्रोडक्शन अकॅडमी मुंबई यांच्या वतीने सदरील पुरस्कार बालाजी किरवले पोलीस सब इन्स्पेक्टर नांदेड यांच्या अविरत समाज कार्याची दखल घेऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार बद्दल सर्व स्तरातून कौतुक करून समाज कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.