वसमत चा ऐतिहासिक दसरा महोत्सव गेली दोन वर्षापासून कोरोणामुळे प्रदर्शनी बंद होती या वर्षीसुद्धा सदरील प्रदर्शन बंद असून केवळ दुर्गा मातेची स्थापना विधिवत पूजा व प्रतिकात्मक रावणाच्या पुतळ्याचे दहन हेच कार्यक्रम यावर्षी असून आज रात्री ठीक नऊ वाजता जिल्हा परिषद मैदानावर रावण दहनाचा कार्यक्रम व गफुरभाई यांच फटाक्याची रोषणाई व अतिशबाजी शासनाने घालून दिलेल्या कोरोणाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष तथा सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे कोषाध्यक्ष श्रीनिवास पोराजवार यांनी दिली यासाठी सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष शिवदास बोड्डेवार, सुनील भाऊ काळे ,गणेशराव काळे,शिवाजी अलडिंगे , काशिनाथ भोसले यांच्यासह सार्वजनिक दसरा महोत्सव समिती चे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.