आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

रेनबो स्माईल चे माजी मंत्री दांडेगावकर च्या हस्ते थाटात शुभारंभ

रामु चव्हाण

वसमत /

सध्या ड्युटीफिकेशन फार जोरात चालले असून मागील तीन वर्षाच्या सर्वेक्षणानुसार औषध आणि सौंदर्य प्रसाधन जास्त प्रमाणात होत असून दात सुंदर करण्याचे सुद्धा वेगवेगळे औषधी उपचार असून दातांच्या आजाराबरोबरच दाताच्या सौंदर्याचे सुद्धा उपचार करावे असे प्रतिपादन राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी रविवारी वसमत येथे केले .
पाच मार्च रविवारी श्रीनाथ हॉटेलच्या बाजूला रेम्बो इस्माईल मल्टी स्पेशलिस्ट दातांच्या दवाखान्याचे भव्य शुभारंभ राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वसमत विधानसभेचे आमदार राजू भैया नवघरे होते. तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार मुंजाजीराव जाधव. शिवेश्वर बँक चे अध्यक्ष शिवदास बोडेवार. डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ मारुती ‌‌कयातमवार.
माजी नगराध्यक्ष अब्दुल हफिस. खालील अहमद. श्रीनिवास पोरजवार. वैद्यकीय अधीक्षक डॉ गंगाधर काळे. हृदयरोग तज्ञ सन उल्ला खान. वकील संघाचे अध्यक्ष एड रणधीर तेलगोटे. ज्येष्ठविधीतज्ञ एड सिराज आलम .आय एम आय चे अध्यक्ष डॉ बाळासाहेब सेलुकर .ठाकरे गटाचे अध्यक्ष काशिनाथ भोसले. आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना दांडेगावकर म्हणाले की पहिले वसमतच्या रुग्णाला विविध रोगांच्या तज्ञ डॉक्टरांकडे जाण्यासाठी नांदेड .मुंबईला जावं लागत होते. पण आता वसमत मध्ये सुद्धा तज्ञ डॉक्टरांच्या संख्येत भरमसाठ वाढ झाली असून वसमत वासियांना मोठा शहराला जाण्याचा खर्च तज्ञ डॉक्टरांच्या वसमत येथे उपलब्धतेमुळे वाचणार आहे .रेनबोस्माईलचे डॉ शकेब अहमदने सुद्धा मुंबई .दिल्ली, पुणे. सारख्या महानगरात अनुभव प्राप्त करून वसमत येथे पहिलाच मल्टी सुपर स्पेशलिस्ट दातांचा दवाखाना सुरू केला असून वसमत च्या जनतेने त्यांच्या तज्ञ पदवीचा लाभ घेण्याचे आवाहन दांडेगावकर यांनी यावेळी केली यावेळी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर मारुती कैतमवार यांनी डोळ्यांचा आणि दातांचा आजार कसा होतो. यावर प्रभावित मार्गदर्शन केले. यावेळी आमदार राजू भैया नवघरे .शिवेश्वर बँक चे अध्यक्ष शिवदास बोडेवार. वकील संघाचे अध्यक्ष रनधिर तेलगोटे आदींनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाच उत्कृष्ट सूत्रसंचालन संपादक फिरोज पठाण यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ पत्रकार इसाक पठाण यांनी केले . या शुभारंभ प्रसंगी शहरातील विविध राजकीय पक्षातील नेते .कार्यकर्ते .विधीतज्ञ .डॉक्टरों. पत्रकार .प्रतिष्ठित नागरिक. व्यापारीही. मोठ्या संख्येने उपस्थित रेनबो स्माईल चे संचालक डॉक्टर शकेब अहमद आणि रेनबो बाल रुग्णालयाचे डॉ शारेक अहमद यांना शुभेच्छा दिल्या .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!