
वसमत / रामु चव्हाण
वसमत नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दि.17 नोव्हेंबर शेवटचा दिवशी अक्षरशः गर्दी होऊन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये शिवसेना, भाजपा ,शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी शरद पवार , काँग्रेस, अपक्ष यांच्यासह विविध पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
शिवसेनेचे डॉक्टर मारोतराव क्यातमवार यांनी शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या पत्नीचे उमेदवारी अर्ज दाखल केला होता पण ऐन शेवटच्या दिवशी त्यांनी एबी फॉर्म व भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे मोठा राजकीय उलथापालथ झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले. यासह वसमत मध्ये अनेक जणांना एबी फॉर्म देताना इतर पक्षातून आलेल्यांना एबी फॉर्म देण्यात आल्याचेही घटना घडत आहेत यामुळे निष्ठावंतांमन्ये नाराजी पसरलेली आहे बाहेरून आलेल्या उमेदवारांना उमेदवारी दिल्याने स्थानिक उमेदवार आणि स्थानिक पक्षाचे कार्यकर्ते यांच्यामध्ये नाराजीचा सूर पहायला मिळत आहेत धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळेस अंतिम यादी जर आपण पाहिली तर आयाराम उमेदवारांना जास्त उमेदवारी देण्यात सर्वच पक्षांनी भर दिलेला आहे हे यावरून पाहायला मिळते.
वसमत नगर परिषद निवडणूक आजचे प्राप्त उमेदवारी अर्ज
सदस्य- 233
अध्यक्ष 19
एकूण 252
आजपर्यंत एकुण दाखल झालेले अर्ज
अध्यक्ष 28
सदस्य 390
एकूण 418
नगराध्यक्ष पदासाठी

नगरसेवक पदासाठी


