सुषमा कालेकर मॅडम व शिंदे मॅडम यांच्या संकल्पनेतून विज्ञान प्रदर्शन उपक्रम
वसमत / प्रतिनिधी
वसमत येथील जवाहर विद्यालय येथे आज दिनांक २८/२/२०२३ वार मंगळवार रोजी विज्ञान दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक देशमुख के एस, प्रमुख पाहुणे गौतम पारखे सर यांच्या हस्ते या विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांचा सत्कार करून सर्व विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले. यामध्ये सूर्यमाला, ज्वालामुखी उद्रेक, फुफ्फुसातील कार्यप्रणाली, पवन चक्की, जलचक्र, ह्रदय रक्ताभिसरण, रसायनशास्त्र यावर आधारित काही प्रयोग, वनस्पती पेशी, प्राणी पेशी, प्रकाश संश्लेषण क्रिया, विविध वैज्ञानिकांनी माहिती पोस्टर, असे सर्वगुणसंपन्न वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारी नाविन्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी शिक्षिका सुषमा कालेकर मॅडम, व शिंदे मॅडम यांनी अत्यंत कमी वेळात अथक प्रयत्नाने विद्यार्थ्यांच्या मदतीने ही विविध वैज्ञानिक मॉडेल, पोस्टर तयार करून विज्ञान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करून विद्यार्थ्यांसमोर वैज्ञानिक आदर्श निर्माण केला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी सहभागी शिक्षिका व विद्यार्थी यांचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या. तर सर्व विद्यार्थी मोठ्या आतुरतेने व उत्साहाने हे सर्व विज्ञान प्रदर्शन उपक्रम पाहत होते व शिक्षकांना माहिती विचारत तर सहभागी शिक्षिका सुषमा कालेकर यांनी अत्यंत सोप्या व समजुतदार भाषेत विद्यार्थ्यांना सर्व माहिती सांगितली, तर याकार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, वैज्ञानिक जिज्ञासा निर्माण करणे असुन विद्यार्थ्यांनी स्वतः कार्यक्षम व्हाव, वैज्ञानिकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. विद्यार्थ्यांना वैज्ञानिकांची माहिती होणे, विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी उत्सुकता वाढवणे आदी उद्देश सांगत सर्व प्रदर्शित मॉडल चा माहिती जवाहर विद्यालय वसमत येथील शिक्षिका सुषमा कालेकर यांनी दिली.