आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी
लाल बहादूर शास्त्री विद्यालय,वसमत येथे महिलादिन उत्साहात साजरा
रामु चव्हाण

वसमत:-
वसमत येथिल लाल बहादूर शास्त्री विद्यालयात अनेक उपक्रम राबविण्यात येतात. प्रत्येक गोष्ट विवीधतेने आणि वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्न केले जातात.
आज महिला दिनाचे औचित्य साधून सर्व शिक्षकांनी महिला शिक्षकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ही करण्यात आले. शाळेतील विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या महिलांच्या भुमिका साकार केल्या.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ.संजना चव्हाण मँडम व सेमी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ.प्रतिभा गोंगे मँडम यांची उपस्थिती होती. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रियाज सर व गोविंद गडगिळे सर यांनी केले.तर मार्गदर्शन व विशेष माहिती दुर्गाताई ढेपे मँडम व श्रावणी कोरडे व अनुज मगर या विद्यार्थ्यांनी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे आयोजन इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक आसाराम दुधाटे सर व प्रकाश कांबळे सर यांनी केले. सर्व महिला शिक्षकांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
शाळेचे अध्यक्ष संदिप चव्हाण सर यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या व आभार प्रदर्शन शिवराज कदम सर यांनी केले.