अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांची 1 लाख 52 हजार रुपये ची शैक्षणिक शुल्क माफ
रामु चव्हाण

अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने विद्यार्थ्यांची एक लाख 52 हजार रुपये ची शैक्षणिक शुल्क माफ
वसमतचा समर्थक क्लासेसचा अभिनव उपक्रम
वसमत – रामु चव्हाण
मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी तसेच पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये हाहाकार झाला असून शोधातील पिके अन्नधान्य राहत्या घरांचे मोठे नुकसान अतिवृष्टीमुळे झाले आहे.
वसमत तालुक्यातील अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये, घरात पाणी शिरल्यामुळे संसार उपयोगी साहित्य अन्नधान्य खराब झाले आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य चे मोठे नुकसान झाल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर शैक्षणिक अडचण निर्माण झाली आहे तसेच शेतातील पिके गेल्यामुळे शाळेची क्लासेसची फीस भरणे सुद्धा पालकांना अवघड होते याचा विचार करून सामाजिक बांधिलकी जपलेल्या वसमत येथील गणेश सरदेशपांडे यांचे समर्थ कोचिंग क्लासेस यांच्या वतीने अकरावी आणि बारावीच्या वीस विद्यार्थ्यांची जवळपास एक लाख 52 हजार रुपये फी त्यांनी माफ करून विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग देण्याचे त्यांनी संकल्प केला आहे. यानिर्णयाचे पालकांनी स्वागत केले असून शालेय विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळून त्यांचा शैक्षणिक खर्च उचलल्याने समर्थ कोचिंग क्लासेस चे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
समर्थ कोचिंग क्लासेस चे गणेश सरदेशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या अतोनातून नुकसान झाले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे कुठलेही शैक्षणिक नुकसान होऊ नये तसेच पालकांना फीस देणे सुद्धा यामुळे शक्य होणार नसल्याने आम्ही फुल नाही फुलाची पाकळी म्हणून एक छोटीशी मदत म्हणून हा शैक्षणिक खर्च उचलला असून आम्ही या वीस विद्यार्थ्यांचे जवळपास एक लाख 52 हजार रुपयाची फीस माफ केली असून यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही व पालकांनाही थोडाफार का होईना आमच्या वतीने ही पूरग्रस्तांसाठी मदत होईल असे सांगितले