वसमत नगर परिषदेचे आरक्षण सोडत दिनांक 8 ऑक्टोंबर रोज बुधवार जाहीर करण्यात येणार असल्याचे नगर परिषदेचे मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर यांनी सांगितले आहे.
वसमत नगर परिषदेच्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला ,नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्व साधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता ही सोडत काढण्यासाठी दिनांक 8 ऑक्टोंबर 2025 रोज बुधवारी दुपारी एक वाजता सुरमणी कै. दत्ता चौगुले सांस्कृतिक सभागृह कारंजा चौक वसमत येथे ही सोडत काढण्यात येणार आहे.
तसेच हे आरक्षण सोडत दिनांक 9 ऑक्टोंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल तसेच या आरक्षण सोडतीवर हरकती व सूचना सादर करण्याच्या कालावधी दिनांक 9 ऑक्टोबर ते दिनांक 14 ऑक्टोंबर दुपारी तीन वाजेपर्यंत या सोडतीवर आक्षेप किंवा हरकती दाखल करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी अशितोष चिंचाळकर यांनी सांगितले आहे.