हु बहिर्जी विद्यालय वसमत येथील गणित शिक्षक श्री नविन शेळके यांचा राजू भैया नवघरे प्रतिष्ठान तर्फे सत्कार
वसमत / रामु चव्हाण
दिनांक 7 सप्टेंबर रोजी राजू भैया नवघरे प्रतिष्ठान तर्फे येथील सुरमणी दत्ता चौघुले सभागृहात अनुक्रमे तालुक्यातील 71 शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते सत्कार सन्मान करण्यात आले.या मध्ये हुतात्मा बहिर्जी विद्यालयात गेल्या 22 वर्षांपासून कार्यरत असलेले गणित शिक्षक श्री नविन गोपाळराव शेळके यांचा सत्कार करण्यात आला. नविन शेळके सर यांचे गणितावर फार प्रभाव आहे.विद्यालयातील दरवर्षी 10 वी तील भरपूर विद्यार्थी गणित विषयात 100 पैकी 100 गुण घेत असतात . श्री नविन शेळके सर यांना वृक्षारोपण ,गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मदत करणे तसेच खेळाची आवड असल्याकारणाने त्यांनी विद्यालयात व्हॉलीबॉल ,टेबल टेनिस, बुद्धिबळ खेळतील भरपूर खेळाडू तयार केलेले आहेत.शाळेचा व्हॉलीबॉल चा संघ त्यांनी राज्यपातळी पर्यंत नेला आहे व प्रथमच विद्यालयातील एक खेळाडू कृष्णा बुचाले हा राष्ट्रीय पातळीवर खेळलेला आहे.
त्यांच्या या कार्याचा गौरव राजू भैया नवघरे प्रतिष्ठान यांनी केला असल्याने त्यांच्या मित्र मंडळामध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.
त्यांना मिळालेल्या पुरस्कारा मुळे व्हॉलीबॉल मित्र मंडळ संजय बेंडके,कल्याण कुरुंदकर,गजानन गायकवाड,बाळासाहेब बेले,विक्रम कुंटूरवार ,गजानन साळवे,पंकज मुळे ,कुणाल बोबडे, गिरीष कदम,नंदू परदेशी,भीमाशंकर अल्लमखाने, नकुल शिरपूरकर पोलिस मित्र टाक साहेब,सवंडकर साहेब, बावले साहेब व्यापारी मित्र महेश दलाल,किरण कापुसकरी,राहुल लालपोतु,सचिन लालपोतु, विजय राखोंडे,शंकर भुसारे,कासले,अग्रवाल असा भरपूर मित्र परिवार आनंदित झाला आहे सर्व मित्रांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत व त्यांचे अभिनंदन केले आहे.