वसमतचे नूतन तहसीलदार म्हणून सारंग चव्हाण यांनी स्वीकारला पदभार; महसूल विभागाच्या वतीने जंगी सत्कार!
संपादक हरनामसिंग चव्हाण

वसमतचे नूतन तहसीलदार म्हणून सारंग चव्हाण यांनी स्वीकारला पदभार; महसूल विभागाच्या वतीने जंगी सत्कार!
वसमत CT NEWS
वसमत तहसील कार्यालयाचे नूतन तहसीलदार म्हणून सारंग चव्हाण यांनी आज अधिकृतपणे आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्याबद्दल महसूल विभागाच्या वतीने त्यांचे उत्साहात स्वागत करत सत्कार करण्यात आला.
तहसील कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या या पदभार ग्रहण व स्वागत समारंभाप्रसंगी उपविभागीय अधिकारी (एसडीओ) श्री. माने साहेब, नायब तहसीलदार श्री. डोणगावकर साहेब प्रामुख्याने उपस्थित होते.
नूतन तहसीलदार सारंग चव्हाण यांचे प्रशासकीय वर्तुळात आणि महसूल विभागातर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी महसूल विभागातील सर्व अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, आणि कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदभार स्वीकारल्यानंतर नूतन तहसीलदारांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत कामाचा आढावा घेतला.
छायाचित्र व वृत्त: नागेश चव्हाण, वसमत.



