आपला जिल्हासामाजिक

गोरगरिबांचा कैवारी! संदीप कदम यांच्या अथक प्रयत्नांना मोठे यश; वसमत तालुक्यातील अनेक दिव्यांगांचे मानधन अखेर सुरू! १० वर्षीय वाक्-अक्षम विश्वजीत जाधवचा वनवास संपला; हिंगोली जिल्हा रुग्णालयाकडून ४६% अपंगत्व प्रमाणपत्र मंजूर

संपादक हरनामसिंग चव्हाण

गोरगरिबांचा कैवारी! संदीप कदम यांच्या अथक प्रयत्नांना मोठे यश; वसमत तालुक्यातील अनेक दिव्यांगांचे मानधन अखेर सुरू!
१० वर्षीय वाक्-अक्षम विश्वजीत जाधवचा वनवास संपला; हिंगोली जिल्हा रुग्णालयाकडून ४६% अपंगत्व प्रमाणपत्र मंजूर

वसमत CT NEWS

समाजातील अत्यंत वंचित, गरीब आणि गरजू घटकांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी  राज्यमंत्री मेघनादीदी बोर्डीकर मित्र मंडळाचे वसमत तालुकाध्यक्ष तथा खंदे सामाजिक कार्यकर्ते संदीप कदम यांनी स्वतः पुढाकार घेऊन राबवलेली ‘दिव्यांग कल्याण मोहीम’ आता खऱ्या अर्थाने यशस्वी ठरताना दिसत आहे. शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवूनही ज्या दिव्यांग बांधवांना वर्षानुवर्षे हक्काचे अपंगत्व प्रमाणपत्र मिळत नव्हते, अशा अनेक दिव्यांगांचे ‘स्वावलंबन कार्ड’ (UDID Card) संदीप कदम यांनी स्वतः वैयक्तिक पातळीवर प्रशासकीय यंत्रणेशी लढा देत आणि सातत्याने पाठपुरावा करून मिळवून दिले आहे. केवळ प्रमाणपत्रच नव्हे, तर या दिव्यांग बांधवांना जगण्यासाठी आर्थिक बळ देणारे मासिक मानधन (संजय गांधी निराधार योजना व इतर) तात्काळ सुरू करून देण्यासाठी त्यांनी थेट मंजुरी मिळवून आणली आहे.
आज आणखी एका निष्पाप बालकाला मिळाला न्याय!
संदीप कदम यांच्या याच अविरत आणि प्रामाणिक प्रयत्नातून आज वसमत तालुक्यातील विश्वजीत राजू जाधव (वय १० वर्षे) या बालकाचा वनवास संपला आहे. त्याचे ‘भाषण आणि भाषा अपंगत्व’ (Speech and Language Disability) चे कायमस्वरूपी अपंगत्व प्रमाणपत्र यशस्वीरित्या प्राप्त झाले आहे. जिल्हा रुग्णालय, हिंगोली यांच्याकडून हे प्रमाणपत्र जारी करण्यात आले असून, यात बालकाला ४६% अपंगत्व असल्याचे प्रमाणित करण्यात आले आहे. या बालकाला देखील आता शासनाच्या मानधन योजनेचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आहे.
प्रशासकीय क्लिष्टतेवर मात करत थेट ‘फिल्ड’वर कामगिरी
गोरगरीब आणि दिव्यांग बांधवांना कागदपत्रांच्या तांत्रिक अडचणींमुळे शासकीय योजनांचा लाभ घेता येत नव्हता. हीच अडचण ओळखून संदीप कदम यांनी एसी केबिनमध्ये न बसता, स्वतः प्रत्येक लाभार्थ्यांच्या घरी जाऊन कागदपत्रांची गोळाबेरीज केली. शासकीय अधिकाऱ्यांकडे दिवस-रात्र पाठपुरावा करून तालुक्यातील अनेक गरजू दिव्यांगांच्या आयुष्याला आर्थिक आधार दिला आहे. त्यांच्या या थेट ग्राऊंड लेव्हलवरील कर्तृत्वामुळे आणि संवेदनशील सामाजिक बांधिलकीमुळे संपूर्ण वसमत तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा प्रचंड वर्षाव होत आहे.
“दिव्यांगांची सेवा हेच माझे कर्तव्य!”
“प्रशासकीय क्लिष्टता आणि कागदपत्रांच्या त्रासामुळे अनेकदा खरे गरजू व्यक्ती योजनांपासून वंचित राहतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी मी स्वतः प्रत्येक दिव्यांगाच्या फाईलचा शेवटपर्यंत पाठपुरावा करून ही प्रमाणपत्रे मंजूर करून आणली आहेत. तालुक्यातल्या एकाही दिव्यांग बांधवाचे मानधन थांबणार नाही आणि त्यांना समाजात सन्मानाने जगता येईल, यासाठी माझे हे सेवाकार्य यापुढेही अविरत सुरू राहील.”
– संदीप कदम
(अध्यक्ष: राज्यमंत्री मेघनादीदी बोर्डीकर मित्र मंडळ, वसमत तथा खंदे सामाजिक कार्यकर्ते)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!