वसमत डॉक्टर फिजिशियन असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा; अध्यक्षपदी डॉ. सनाउल्ला खान व उपाध्यक्षपदी डॉ. राहुल गोरे यांची निवड
वसमत / रामु चव्हाण
वसमत शहरातील नामांकित फिजिशियन (एम.डी. व डी.एन.बी. मेडिसिन) डॉक्टरांनी एकत्र येऊन ‘वसमत डॉक्टर फिजिशियन असोसिएशन’च्या अधिकृत नवीन कार्यकारिणीची घोषणा केली आहे. शहरात वैद्यकीय सेवा अधिक सक्षम करणे, क्रिटिकल (गंभीर) रुग्णांवर वेळेत योग्य उपचार करणे आणि वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन संशोधनांची देवाणघेवाण करणे हे या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
वसमत येथे आज एका छोटेखानी कार्यक्रमात ही निवड करण्यात आली यात.
अध्यक्ष: डॉ. सनाउल्ला खान (MD Medicine)
उपाध्यक्ष: डॉ. राहुल गोरे (DNB Medicine)
सचिव: डॉ. चेतन सातपुते (DNB Medicine)
कोषाध्यक्ष: डॉ. युवराज बेंडे (MD Medicine)
कार्यकारिणी सदस्य: डॉ. उर्मिला जाधव (MD Medicine)
कार्यकारिणी सदस्य: डॉ. दिनेश चिलकेवार (MD Medicine)
संघटनेच्या स्थापनेमुळे वसमत शहर व परिसरातील क्रिटिकल रुग्णांना तातडीने व दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळण्यास मदत होणार असून स्थानिक नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत होत आहे.त्यांच्या या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
Back to top button
Don`t copy text!