वसमत विधानसभा क्षेत्रात पक्ष संघटना मजबूत करण्याचा निर्धार –
18 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर पर्यंत 1 महिना हिंदुह्दय सम्राट वंदनीय शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर
जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना सज्जतेचे आदेश
वसमत : रामु चव्हाण
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वसमत विधानसभा क्षेत्रात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यासोबतच
दि. 18 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2026 या कालावधीत संपूर्ण तालुक्यात एक महिना मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर घेण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे तुषार जाधव यानी सांगितले.
वसमत शहरातील सप्तगिरी या कार्यालयात आज आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत तालुक्याच्या बैठकीला सर्व सर्कल प्रमुख, बुथ प्रमुख, महिला आघाडी, युवासेना, विद्यार्थी आघाडी आणि वरिष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर – सहसंपर्कप्रमुख सुनिल भाऊ काळे
बैठकीच्या सुरुवातीला आगामी राजकीय परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. “वसमत विधानसभा क्षेत्रात जनतेशी थेट संवाद साधणे, कार्यकर्त्यांची बांधणी करणे आणि गावागावातील समस्या सोडवणे हेच आपले प्रमुख ध्येय आहे.”
1. बुथ पातळीवर संघटन मजबुत करणार प्रत्येक कमिटी गठित केली जाणार.
2. सर्कल निहाय जबाबदारी
3. नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात येणार जाहीर
जुनी कार्यकारिणी बरखास्त करून नवीन उत्साही आणि तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात येणार.
4. प्रत्येक जिल्हा परिषद व पंचायत समिती गणाचा गावात भेटी व पक्ष संघटना मजबूत करणार सुनील काळे सहसंपर्कप्रमुख
“निवडणूक जवळ आली की सक्रिय होण्यापेक्षा आजपासूनच जनतेसाठी काम केले तरच जनतेचा विश्वास मिळेल. वसमत विधानसभा क्षेत्रात महिला आघाडीचा संघटन मजबूत करून नवीन आघाडीची कार्यकारिणी लवकरच जाहिर करणार डाॅ रेणुकाताई पतंगे महिला जिल्हाप्रमुख
जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीसाठी सज्ज व्हा
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच कामाला लागावे असे आवाहन करण्यात आले. व संघटनेत नवीन कार्यकर्त्यांना संधी देणार- डाॅ धोंडीराम पार्डीकर तालुका प्रमुख

कार्यकर्त्यांना दिलेल्या 4 प्रमुख सूचना:
1. मतदार यादी तपासणी: आपापल्या बुथवरील मतदार यादी घरोघरी जाऊन तपासावी. नवीन मतदारांची नाव नोंदणी करावी. मृत किंवा स्थलांतरितांची नावे कमी करावीत.
2. जनसंपर्क वाढवा: प्रत्येक कार्यकर्त्याने दररोज किमान 10 कुटुंबांशी प्रत्यक्ष भेट घ्यावी. त्यांच्या समस्या समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी पक्षाकडे पाठपुरावा करावा.
3. शासकीय योजनांची माहिती:शेतकरी सन्मान निधी, आयुष्मान भारत, महिला बचत गट, घरकुल योजना, संजय गांधी निराधार योजना यांची माहिती गावागावात पोहोचवावी. पात्र लोकांना लाभ मिळवून द्यावा.
4. सकारात्मक प्रचार: विरोधकांच्या टीकेला न घाबरता आपल्या कामातून उत्तर द्यावे. सोशल मीडियावर सकारात्मक प्रचार करावा.
“ही निवडणूक फक्त जागा जिंकण्याची नाही, तर जनतेचा विश्वास जिंकण्याची आहे. त्यामुळे कामातूनच उत्तर द्या,” अशा शब्दात कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.
*पक्ष कार्यकारिणीमध्ये मोठे फेरबदल*
बैठकीतील सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे *तालुका कार्यकारिणीमध्ये मोठे फेरबदल* करण्यात येणार असल्याचे व पक्षाने तरुण आणि महिला कार्यकर्त्यांना मोठी संधी द्यावी अशी मागणी होत आहे
*आरोग्य हाच धर्म – 1 महिना मोफत आरोग्य शिबीर*
राजकारणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत दि. 18 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2026 या कालवधीत हिंदुह्दय सम्राट वंदनीय शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त वसमत विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक सर्कलमध्ये *मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर* घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच शिवसेना उबाठा कधी संपली नाही आणि संपणार ही नाही शिवसेनेचे पाळेमुळे हे हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक गावा गावात पोहचली आहेत आणि आगामी निवडणुकीत शिवसेना हा एक नंबरचा पक्ष ठरले असा मत शिवसेनेचे नेते तुषार जाधव यानि सांगितले.
*शिबिराची मुख्य माहिती:*
1. *कालावधी:* 18 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2026
2. *व्याप्ती:* तालुक्यातील सर्व 12 सर्कल
3. *देण्यात येणाऱ्या सुविधा:*
– मोफत आरोग्य तपासणी – BP, शुगर, हिमोग्लोबिन तपासणी
– मोफत नेत्र तपासणी आणि गरजूंना चष्मे वाटप
– तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला आणि मोफत औषधे वाटप
– महिला आणि बालकांसाठी विशेष आरोग्य तपासणी
– ज्येष्ठ नागरिकांसाठी हृदयविकार आणि मधुमेह तपासणी
असे आयोजन करण्यात येणार आहे.
य बैठकीला सहसंपर्कप्रमुख सुनिल काळे,महिला आघाडी सहसंपर्कप्रमुख प्राजक्ता साळवी,
उपजिल्हा प्रमुख अनिल कदम,तालुकाप्रमुख डाॅ धोंडीराम पार्डीकर,महिला जिल्हाप्रमुख डाॅ रेणुकाताई पतंगे ,औंढा तालुकाप्रमुख माऊली झटे ,
शहरप्रमुख काशिनाथ भोसले,तुषार जाधव ,यशवंते मामा,गजानन पतंगे ,रामा साळवे,भाई क-हाळे सह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button
Don`t copy text!