वसमत शहरात महिलेचे भरदिवसा दनकडे व सोन्याचे दागिने चोरट्यानी पळवले
वसमत / रामु चव्हाण
चोरटे CCTV कॅमेयात कैद व्हिडिओ पहा
https://www.instagram.com/reel/DbsWRyoqyIu/?igsh=Y3Vmc2NwODdnZTZi
वसमत शहरात एका महिलेला भुरळ घालत तिचा अंगावरचे दागिणे दिवसा ढवळ्या चोरट्याने पळविल्याची घटना वसमत शहरात घडली आहे.

या बाबत माहिती अशि की शांताबाई नामदेव कदम वय 60 वर्ष व्यवसाय घरकाम रा. पारवा ता. वसमत जि. हिंगोली ह.मु श्रीनगर, भोरीपगाव रोड वसमत यानी दिलेल्या त्या सध्या नातवांच्या शिक्षणासाठी श्रीनगर वसमत येथे राहत आहेत. दि.05.08.2026 रोजी दुपारी 01.00 वा. दरम्याण त्या स्वामी समर्थांचे दर्शन घेण्याकरीता बसस्थानक मार्गे श्रीनाथ हाँटेल च्या बाजुने खराटे हॉस्पीटलकडे जाणा-या मार्गावर भोसले बोरवेल ऑफीसच्या समोर आली असता तेथे दोन अनोळखी ईसम एकाने लाल शर्ट, निळ्या रंगाची पॅन्ट व पांढ-या रंगाची शर्ट घातलेले असे त्यांच्याजवळ आले लाल शर्ट वाल्याने व्यक्तीने त्याना म्हणाला कि, आजी माझे या रस्त्यावर पॉकेट पडले आहे तुम्हाला सापडले आहे का असे म्हणत तो निघुन गेला. तेवढ्यात तेथे पांढ-या रंगाचा शर्ट घातलेला एक ईसम आला त्याने आजी माय तुमच्या थैलेमधुन पाँकीट पडलेले मी उचलेले हे पाँकीट तुमचेच आहे का ते बघा यामध्ये सोने आहे असे म्हणाला असता मी त्यास पाँकीट माझे नाही मला एक जन पॉकेट हरवले आहे सापडले का असे विचारुन गेला. तेवढ्यात ते दोघे एकत्र आले दोघांनी मिळून त्यान् खराटे हॉस्पीटल च्या समोर घेवुन गेले त्याठिकाणी दोन कार लावल्या होत्या त्यांनी हात चलाखी करत त्यांच्या हातातील चांदीचे दंनकडे तसेच कानातील सोन्याच्या काड्या देखील काढुन घेतल्या व त्याना काहीतरी भुरळ घातल्यासारखे वाटल्याने त्या त्यांना प्रतीकार करु शकले नाही. ते निघुन गेल्या नंतर त्याना जाणवले कि, त्याच्या अंगावरील 30 तोळे चांदीचे दंडकडे 1500 रु तोळे प्रमाणे 45,000/- रु व 6 ग्रॅम कानातील सोन्याच्या काड्या 10,000 रु ग्रॅम याप्रमाणे 60,000/- रु असे एकुन 1,05,000/- किंमतीचे सोन्या चांदीचे दागीने भुरळ घालुन हातचालाखी करुन फसवणुक करुन चोरटे पसार झाले .या बाबत वसमत पोस्टेला तक्रार दिली आहा.