आरोग्य व शिक्षणसामाजिक

महिला रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्यात आयसर ट्रक अडकल्याने वाहतूक ठप्प – रुग्णवाहिका अडकून रुग्णांचे हाल

मुख्य संपादक रामु चव्हाण

महिला रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्यात आयसर ट्रक अडकल्याने वाहतूक ठप्प – रुग्णवाहिका अडकून रुग्णांचे हाल
वसमत: रामु चव्हाण
   पावसाळ्याची सुरुवात होताच वसमत शहरातील प्रशासनाचे दुर्लक्ष पुन्हा एकदा समोर आले आहे. वसमत-परभणी रोडवरील महिला रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर  पडलेल्या मोठ्या खड्यात आज एक आयसर ट्रक अडकल्याने  संपूर्ण वाहतूक ठप्प झाली. त्यातच रुग्णालयात जाणारी आणि येणारी रुग्णवाहिका खड्यात अडकल्याने रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
काय घडले
  • आज झालेल्या मुसळधार पावसामुळे महिला रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डा आणखीनच मोठा आणि खोल झाला. या रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून मोठे खड्डे पडलेले आहेत यात वारंवार दुचाकी, चारचाकी वाहने अडकत होती, मात्र संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केले होते.
आज  एक आयसर ट्रक या खड्यात अडकून जागीच बंद पडला. त्यामुळे थोरावा-गणेशपूर कडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली. याच वेळी महिला रुग्णालयात प्रसूतीसाठी जाणारी आणि उपचार घेऊन परतणारी रुग्णवाहिका देखील या खड्यात अडकली.
रुग्णवाहिका सुमारे 1 तास  जागीच अडकून राहिल्याने आत असलेल्या रुग्णाला आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला आहे
नागरिकांचा संताप
“हा रस्ता थेट महिला रुग्णालयाकडे जातो. इथे रोज डझनभर रुग्णवाहिका ये-जा करतात. पण प्रशासनाला याची काहीही पडली नाही. पावसात खड्डा मोठा झाला आणि आज त्याचा फटका थेट रुग्णांना बसला” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.
व्यापारी आणि वाहनचालकांनीही या रस्त्याची तातडीने डागडुजी करावी अशी मागणी केली आहे.
*प्रशासनाचे दुर्लक्ष*
हे खड्डे गेल्या 2 महिन्यांपासून आहे. अनेकांनी तक्रारी केल्या, पण कोणीही दखल घेतली नाही. महिला रुग्णालय हा अतिशय महत्वाचा रस्ता असूनही इथे कोणतेही बॅरिकेड, सूचना फलक किंवा तात्पुरती डागडुजी करण्यात आलेली नाही.
*मागणी*
1. तातडीने खड्डा बुजवून रस्ता दुरुस्त करावा.
2. रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याला प्राधान्य देऊन कायमस्वरूपी डागडुजी करावी.
3. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची पाहणी करून खड्डे बुजवावेत.
जर लवकरात लवकर दुरुस्ती झाली नाही तर नागरिक रस्ता रोको आंदोलन करतील असा इशाराही देण्यात आला आहे.
महिला आणि नवजात बालकांसाठी जाणारा हा रस्ता “खड्डेमय” असल्याने प्रशासनाने डोळे उघडून तातडीने पावले उचलावी अशी मागणी होत आहे.
शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!