वसमत ग्रामीण हद्दीत 19 गोवंशाची सुटका – सकल हिंदू समाजाकडून वसमत बंदची हाक

वसमत (प्रतिनिधी):
वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जवळा खंदारबन शिवारातील शेतात निर्दयपणे, अन्न-पाण्याविना कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या 19 गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र या प्रकरणातील आरोपींवर अधिक कठोर कारवाई व्हावी आणि गोवंशाचे संरक्षण व्हावे या मागणीसाठी आज सकल हिंदू समाज, वसमत यांच्या वतीने मोंढा मारोती मंदिर येथे महत्त्वाची आढावा बैठक घेण्यात आली.
बैठकीतील प्रमुख निर्णय आणि मागण्या
1. कठोर कारवाईची मागणी कत्तलीच्या उद्देशाने गोवंशावर अत्याचार करणाऱ्या सर्व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
2. वसमत बंदची हाक या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत आणि गोरक्षणाच्या समर्थनार्थ वसमत बंदची हाक देण्यात आली आहे.
3. नागरिकांना आवाहन बंदच्या दिवशी सर्व व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांनी आपापले व्यवहार बंद ठेवून या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा.
या बैठकीला वसमत शहरातील व्यापारी, गोरक्षक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. सर्वांनी एकमुखाने आरोपींवर तात्काळ व कडक कारवाई करण्याची मागणी केली.
सकाळी 10 वा शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी जमा होणार आहेत व या ठिकाणाहून मोर्चा वसमत शहरातुन तहसील कार्यालयावर धडकणार आहे तसेच उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.
Back to top button
Don`t copy text!