पावसाने भिंत कोसळून गाईचे वासरू ‘गोऱ्हे’ ठार – शहरपेठेत दत्ता डिडेवार यांच्या घराचे मोठे नुकसान
वसमत: रामु चव्हाण
गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वसमत शहर आणि तालुक्यात ठिकठिकाणी पावसाचे पाणीच पाणी झाले आहे. शहरपेठ येथे पावसामुळे भिंत कोसळून एका गाईच्या वासराचा अर्थात गोऱ्ह्याचा मृत्यू झाला आहे. याच पावसात दत्ता लक्ष्मणराव डिडेवार यांच्या घराची भिंत पडून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
*काय घडले?*
दिवसभर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शहरपेठ भागातील एका भिंतीचा काही भाग अचानक कोसळला. त्यावेळी तेथे बांधले गाईचे वासरू या ढिगाऱ्याखाली दबले गेले. घरातील लोकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली, मात्र तोपर्यंत वासराचा जागीच मृत्यू झाला होता.तसेच दत्ता लक्ष्मणराव डिडेवार यांच्या घराची भिंत पूर्णपणे कोसळली. त्यामुळे घरातील संसारोपयोगी साहित्याचे आणि बांधकामाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
*ग्रामस्थांची मागणी*
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला तातडीने मदत करण्याची मागणी केली आहे.
1. नुकसानग्रस्त कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत द्यावी.
2. तलाठी आणि महसूल विभागाने पंचनामा करून भरीव मदत द्यावी अशी मागणी या भागाचे नगरसेवक प्रभाकर क्षीरसागर यानी केली आहे.
*प्रशासन सतर्क*
हवामान विभागाने पुढील 48 तास पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे महसुल प्रशासन,नगर परिषद आणि पोलिस प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मोडकळीस आलेल्या घरांपासून आणि भिंतींपासून दूर राहावे असे सांगण्यात आले आहे.
पावसामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी होत आहे.
पावसाने कुठेही हानी झाली असल्यास तात्काळ महसुल अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा तसेच नुकसान झालेल्या ठिकाणचे तातडीने पंचनामे करून मदत देण्यात येईल असे आश्वासन तहसीलदार सारंग चव्हाण यानी दिले आहे
Back to top button
Don`t copy text!