वसमत / रामु चव्हाण
रोख रक्कम व सोन्याची साखळीही पळवली
वसमत : रामु चव्हाण
वसमत शहरात दि 28 ऑगस्ट चा सकाळी 3 ते 4 वा सुमारास बुधवारीपेठ भागात एका घरात घुसून मारहाण, जबरी चोरी आणि बंदुकीचा धाक दाखवून 20 वर्षीय तरुणीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या बाबत माहिती अशी की बुधवार पेठ येथे 28 ऑगस्ट रोजी पहाटे 3 ते 4 वाजता अज्ञात 4 जणांनी घरात प्रवेश केला
आरोपींनी घरातील एकाला जबर मारहाण केली व त्याचे हातपाय बांधून ठेवले. त्यानंतर बंदुकीचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली.
घरातील रु. 9,225 रोख रक्कम आणि फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची साखळी असा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतला. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी फिर्यादीच्या 20 वर्षीय मुलीचे फिल्म स्टाईलने अपहरण केले बाबतची तरुणीच्या वडिलांनी वसमत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. वसमत शहर पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक डेडवाल तपास करत आहेत.
Back to top button
Don`t copy text!