वसमत शहरात धक्कादायक खून ; पोलीसांना टिप देतो या कारणावरून तरुणाची दगड-विटांनी ठेचून हत्या, तिघांवर गुन्हा दाखल
वसमत – रामु चव्हाण
वसमत शहरातील सोमवार पेठ परिसरात आज पहाटे एका धक्कादायक खुनाची घटना उघडकीस आली आहे. “तू पोलिसांना टिप का देतो” या कारणावरून तिघा आरोपींनी संगनमत करून एका 22 वर्षीय तरुणाची दगड आणि विटांनी गंभीर मारहाण करून हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गु.र.नं. 0575/2026 कलम 103(1), 3(5) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत तरुणाचे नाव गणेश दिगांबर गुंडाळे, वय 22 वर्षे, रा. रुपला पांढरी ता. पूर्णा जि. परभणी, ह.मु. पाटीलनगर, वसमत असे आहे.
तर फिर्यादी पवन माणिकराव डाखोरे, वय 27 वर्षे, रा. पळसगाव ता. वसमत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
दि. 10/09/2026 रोजी रात्री 00.15 वाजण्याच्या सुमारास सोमवार पेठ, वसमत येथे आरोपी –
तिन आरोपींनी यांनी संगनमत करून फिर्यादीच्या मित्राला गाठले.
“तू पोलिसांना आमची टिप का देतो” असे म्हणत आरोपींनी दगड, विटांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गणेश गुंडाळे हा गंभीर जखमी झाला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वसमत शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोउपनि शिवाजी बोंडले यांनी हा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सपोनि परगेवार हे करत आहेत.
या घटनेनंतर वसमत शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांना मिळताच त्यांनी घटनास्थळाला भेट दिली.
या प्रकरणातील आरोपी अद्याप अटक नसून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
Back to top button
Don`t copy text!