वसमत येथील 15 दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण अखेर मागे; मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आदेशानंतर उपोषण सोडले
वसमत / रामु चव्हाण
व्हिडिओ पहा
ps://www.instagram.com/reel/DdNn4IYKquM/?stkn=MXFpOThhMmp4Z3ZzNA==
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वसमत तहसील कार्यालयासमोर 29 ऑगस्ट पासुन गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण अखेर आज सोडण्यात आले. संघर्षयोद्धा श्री. मनोज दादा जरांगे पाटील यांनी स्वतः व्हिडिओ कॉल करून उपोषण सोडण्याचा आदेश दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.
तुषार जाधव यांच्या मोबाईलवरून व्हिडिओ कॉल
वसमत येथे रविकिरण वाघमारे हे गेल्या 15 दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आमरण उपोषणाला बसले होते. त्यांची प्रकृती खालावत चालल्याने समाज बांधवांमध्ये चिंतेचे वातावरण होते.
आज दुपारी संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनची वसमत विधानसभेचे युवा नेते तुषार जाधव यानी भेट घेऊन वसमत येथे सुरू असलेल्या उपोषणाची सविस्तर माहिती दिली .यावेळी मनोज दादानी
यांच्या मोबाईलवरून व्हिडिओ कॉल करत उपोषणकर्त्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रविकिरण यांना “तब्येतीची काळजी घ्या, लढाई अजून बाकी आहे, माझ्या आदेशाने उपोषण सोडा, पुढील आंदोलन मी सांगेन तसे करा” असे आदेश दिले.
मनोज दादांच्या आदेशाचा मान राखत उपोषणकर्त्याने आज 15 व्या दिवशी आपले आमरण उपोषण सोडले.
पुढील आंदोलन मनोज दादा म्हणतील तसे…
उपोषण सोडताना रविकिरण वाघमारे यानि सांगितले की, “संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी तुषार जाधव यांच्या मोबाईलवरून व्हिडिओ कॉलवर मला उपोषण सोडण्याचा आदेश दिला. त्यांच्या आदेशाचे पालन करत आज उपोषणाच्या 15 व्या दिवशी उपोषण सोडले. पुढील आंदोलन मनोज दादा म्हणतील तसे केले जाईल. वसमत येथे सुरू असलेले हे आमरण उपोषण आज संपले असले तरी मराठा आरक्षणाची लढाई थांबणार नाही.”
यावेळी सकल मराठा समाजातील शेकडो मराठा बांधव, महिला ,तरुण उपस्थित होते. उपोषण सुटल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले असून मनोज दादा जरांगे पाटील यांचे आभार मानले आहेत.
तहसील प्रशासनानेही या उपोषणाची दखल घेऊन वरिष्ठांना अहवाल पाठवला आहे